TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वडिलांचा गावागावात जाऊन कपडे विक्रीचा व्यवसाय, आई कंपनीत कामगार ; पोरगी झाली पीएसआय !

जळगावातील कोमल शिंदे दुसऱ्याच प्रयत्नात महाराष्ट्र आयोगाची परीक्षा उत्तीर्ण !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 10, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वडील फेरीवाले दुचाकीवरून गावागावात जाऊन कपडे विक्री करतात तर आई एका कंपनीत कामगार म्हणून काम करते. मात्र या कष्टकरी दांपत्याच्या लेकींन कष्टाची आणि परिस्थितीची जाणीव ठेवत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाला गवसणी घातली आहे. कोमल सोपान शिंदे असे या तरुणीचे नाव असून तिची नुकतीच पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. अगदी प्रतिकूल परिस्थितीत कोमलने अंगावर खाकी चढवण्याचे आणि अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केल आहे.

जळगाव शहरातील कानळदा रोड परिसरात कोमल सोपान शिंदे ही तरुणी वास्तव्याला आहे. आई वडील आणि एक लहान भाऊ असा तिचा परिवार. वडील सोपान शिंदे , चौथी नापास. दुचाकी वर गावोगावी जाऊन कपडे विक्री करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात. तर कोमल ची आई भारती या सुद्धा गेल्या दहा वर्षांपासून जळगावतील जैन इरिगेशन इरिगेशन कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करतात व पतीला उदरनिर्वाह हातभार लावतात. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. काही दिवसांपूर्वी एका खोलीच असलेल्या भाड्याच्या घरात सुद्धा कोमल हीच्या परिवाराने दिवस काढले. या घरात शौचालय सुद्धा नव्हते अस कोमल सांगते. मात्र हीच परिस्थिती कोमल हीची ताकद बनली. काही दिवसांनी आई वडिलांनी जमविलेल्या पैशातून एक रूम किचन चे नवीन घर घेतले. मात्र पोरांसाठी चे आई वडिलांचे कष्ट सुरूच होते.

READ ALSO

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

शाळेच्या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी आली अन् तिला पाहून कोमलन सुद्धा अधिकारीच व्हायचं ठरवलं !

कोमल आठवी ते नववीच्या वर्गात शिकत असताना कोमलच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरणासाठी प्रमुख अतिथी म्हणून एक महिला पोलीस अधिकारी आल्या होत्या. या महिला पोलीस अधिकाऱ्याला पाहून कोमलने सुद्धा आपणही पोलीस अधिकारीच व्हायचं अंगावर वर्दी चढवायची हे स्वप्न बघितलं. आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिचा प्रवास सुरू झाला, असं कोमल सांगते. कोमल हिने वाणिज्य शाखेतून पदवी घेतली आहे. तर एमएसडब्ल्यू पूर्ण करत तीच पदवीत्तर शिक्षण सुद्धा पूर्ण झाल आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोमलने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची माहिती घेत तयारी सुरू केली.

भाचीने मोठ व्हावं म्हणून ट्रकचालक मामा कामात पडला !

आई-वडिलांचे कष्ट कोमल डोळ्याने बघत होती. त्यांच्या कष्टाची तिला जाणीव होती मात्र परिस्थितीशी लढायचं कसं आणि पुढे जायचं कसं हा मार्ग तिला मिळत नव्हता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकाच मार्गदर्शन, खाजगी क्लास लावणं कोमलला आवश्यक वाटलं. मात्र त्यासाठी गरज होती ती पैशांची आणि तीच मोठी कोमलची अडचण होती. कोमलला पुढे शिकायचंय शिकून मोठ अधिकारी व्हायचंय आणि यासाठी तिच्याकडे क्लास लावण्यासाठी पैसे नाहीत ही गोष्ट कोमलचे ट्रक चालक मामा मुकेश सपके यांना कळाली. आपण शिकलो नाही मात्र भाचीसाठी कुठे कमी पडायचं नाही. भाचीने मोठ व्हावं म्हणून मामा कामात पडला. मामाने कोमल हिला पैशाची मदत केली. त्यानंतर कोमल हिने 2019 मध्ये जळगावातील युनिक ऍकॅडमी मध्ये क्लास लावला. आणि तिची खऱ्या अर्थानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे तयारी सुरू केली.

पहिल्याच प्रयत्नात अपयश आलं…मात्र या अपयशानंतर ती जिद्दीलाच पेटली !

चार ते पाच महिन्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची जाहिरात निघाली. प्रचंड आत्मविश्वास असलेल्या कोमलने अर्ज भरला. परीक्षा दिली मात्र काही चुकांमुळे कोमल हिला पहिल्याच प्रयत्नात अपयश आलं. कोमलने पुढे आणखी प्रचंड मेहनत घेतली, जिद्दीन अभ्यास केला. मैदानी सराव सुद्धा केला. मात्र एकीकडे तिची स्वप्नांसाठीची परीक्षा सुरू असताना दुसरीकडे मात्र नियतीची ही परीक्षा सुरू होती. 2020 मध्ये कोमल हिने पुन्हा पोलीस उपनिरीक्षक पदासाठी अर्ज भरला मात्र कोरोनाच्या संकटामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. 2021 मध्ये सुद्धा ही परीक्षा झाली नाही. या परीक्षेसाठी सप्टेंबर महिना आणि 2022 हे साल उजाडलं. यंदा संधी वाया घालवायची नाही म्हणून तब्बल दहा ते बारा तास सलग कोमलने अभ्यासिकेत तसेच घरी रांत्रदिवस अभ्यास केला. कोमल हीने पूर्ण तयारीने आणि मेहनतीने अभ्यास करून ही परीक्षा दिली होती. आणि कोमल हीची मेहनत फळाला आली. ती पूर्व आणि मुख्य अशा दोन्ही लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यानंतर मुलाखत व मैदानी चाचणीचां टप्पा सुद्धा कोमलने यशस्विरीत्या पार केला. आणि अखेर अंगावर वर्दी चढवून पोलीस उपनिरीक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण केल.

रहिवाशांना मोठ कौतुक घोड्यावरून कोमलची भव्य मिरवणूक !

नुकताच चार जुलै रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. याच दिवशी कोमल हीचा वाढदिवस होता. एकीकडे वाढदिवस आणि दुसरीकडे एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण असा दुहेरी आनंदाचा दिवस शिंदे कुटुंबात पार पडला. आपली पोरगी अधिकारी झाली हे ऐकून तिच्या आई वडिलांना विश्वास बसत नव्हता. जेव्हा खर काय ते कळलं. तेव्हा मात्र आई वडील दोघांच्या दोन्ही डोळ्यांमधून आनंदाश्रू वाहत होते. तब्बल दोन ते तीन तास कोमल ही खरोखर अधिकारी झाल्याच्या आनंदात तिचे आई वडील हे रडतच होते, अस कोमल सांगते.

नेमकं महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे काय?, हे सुद्धा कोमल हीच्या वडिलांना माहित नाही. त्यांना कोणी विचारायचे की मुलगी काय करते. तर त्यांना एमपीएससी माहित नाही म्हणून ती एमएससीआयटी करते असं सांगायचे. आपण शिकलो नाही म्हणून मुलींने शिकावं तिचं स्वप्न पूर्ण करावं असं कोमल तिच्या वडिलांचं आणि आईचं देखील स्वप्न होतं. त्यासाठीच त्यांची धडपड सुरू होती. मात्र कोमलने ही आपल्या आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवली. पोलीस उपनिरीक्षक होवून कोमल हिने आई-वडिलांच्या कष्टाच चीज केल आहे. कोमलीच्या यशाचं तिला आत असलेल्या परिसरातील रहिवाशांना ही मोठं कौतुक आहे. आपल्या गल्लीत राहणारी कोमल पोलीस उपनिरीक्षक झाल्याच्या आनंदात रहिवाशांनी तिची परिसरात घोड्यावर बसून भव्य अशी मिरवणूक काढली.

परिवारात कोमल पहिलीच शासकीय अधिकारी !

कोमलने या परीक्षेसाठी अनेक गोष्टींचा त्याग केला. जसं की मोबाईल व्हाट्सअप या गोष्टींपासून तब्बल चार वर्षे कोमल ही लांब होती. इतर मुलींना हौस मौज करताना पाहून कोमल तिच्या आईला अनेकदा रडायला यायचं. मात्र तिने स्वतच्या पायावर उभे राहावे, मोठ व्हावं यासाठी तिचा निर्णय बरोबर होता. आहे त्या परिस्थितीत कोमल हिने जे यश मिळवल आहे. त्याचा मोठा अभिमान कोमल हीच्या आई-वडिलांना आहे. कोमल ही तिच्या खानदानातील कुटुंबातील पहिलीच शासकीय अधिकारी आहे. मुलगी ओझं नसते, एखाद्या मुलाप्रमाणे आमच्या मुलीने कुळाच आणि आमचं नाव रोशन केलं आहे. कोमल हीचा मोठा गर्व आहे, तिच्या यशाचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही असं कोमल हीची आई भारती शिंदे तसेच वडील सोपान शिंदे सांगतात.

अस काम करायचं की, माझ्यामुळे समाजात कोणालातरी प्रेरणा मिळाली पाहिजे !

आई-वडिलांचे कष्ट बघून खूप त्रास होत होता. त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ही जिद्द मनात होती. त्यासाठीच पोलीस उपनिरीक्षक पदाचं स्वप्न बघितलं. आज मी हे स्वप्न पूर्ण करू शकले, त्याचा मला मोठा आनंद आणि समाधान आहे. जेवढे आई-वडिलांनी कष्ट केले. त्यापेक्षाही दुप्पट त्यांना मला आनंद द्यायचा आहे. पोलीस उपनिरीक्षक म्हणून प्रशासनात चांगलं काम करेल. मला पाहून समाजात कोणालातरी प्रेरणा मिळेल. आणि अधिकारी व्हावंस वाटेल असं काम मला करायचं असल्याचं कोमल आत्मविश्वासाने सांगते. परिस्थिती आणि आलेल्या संकटांवर मात करत प्रचंड जिद्दीने अभ्यास करत कोमल हिने जे यश मिळवल आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

April 12, 2026
गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 12 ते 18 एप्रिल 2026 !

April 12, 2026
जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार १० जुलै २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना मिळवण्यासाठी भव्य पेन्शन मेळावा !

January 5, 2021

Today’s Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 28 फेब्रुवारी 2025

February 28, 2025

अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

December 7, 2025

बिहारच्या बालनिरीक्षणगृहात पुन्हा लैंगिक अत्याचार उघड !

August 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group