नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बिहारच्या (Bihar News) समस्तीपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे पेशाने शिक्षक असलेल्या एक बाप आपल्याच 18 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करत होता. दोघेही पीडितेला धमकावून गप्प करायचे. यानंतर पीडितेने वडिलांच्या घाणेरड्या कृत्याचा व्हिडिओ बनवला आणि पोलीस ठाणे गाठून वडिलांविरोधात
मिळालेल्या माहितीनुसार, रोसेरा गावातील ५० वर्षीय आरोपी हा पेशाने शिक्षक आहे. त्याच्या १८ वर्षांच्या मुलीने त्याच्यावर बलात्कार आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे. तिने तिच्या क्रूर कृत्य समोर आणण्यासाठी छुपा कॅमेरा वापरून या कृत्याला व्हिडीओ शूट केला. त्यानंतर तिने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत न्यायाची मागणी केली आहे. तिने व्हिडीओ शेअर केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.
रोसेरा उपविभागाचे डीएसपी सहियार अख्तर यांनी सांगितले की, व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी मुलीच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवला आणि आरोपी वडिलांना अटक केली. “पोलिसांनी व्हायरल व्हिडीओमध्ये पीडितेसोबत दुष्कर्म करणाऱ्या वडिलांना अटक केली असून या प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जात आहे. तसेच पीडितेच्या जबाबावरून इतर आरोपींचा शोध सुरू आहे,” असे डीएसपी सहियार अख्तर यांनी सांगितले.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी वडिलांची चौकशी केली असून या प्रकरणात आणखी काही आरोपी आहेत का याचा तपास सुरू केला आहे. तसेच पीडितेच्या आईने या कृत्याला विरोध केला नाही आणि तिचे मामा तिच्यावर या प्रकाराची वाच्यता न करण्यासाठी दबाव आणत होते, असा आरोप पीडितेने केला आहे.