चंद्रपूर (वृत्तसंस्था) शेत जमीन दुसऱ्या व्यक्तीच्या नावे करण्यासाठी तडजोडीअंती १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने दुय्यम निबंधकाला रंगेहात अटक केली आहे. वैशाली मिटकरी असे महिला दुय्यम निबंधकाचे नाव आहे.
दुय्यम निबंधकाने अर्जदाराला 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली, 12 ऑक्टोबर ला तडजोडीअंती 10 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने दुय्यम निबंधकाला रंगेहात अटक केली. मूलच्या दुय्यम निबंधक कार्यालयात दुय्यम निबंधक वैशाली मिटकरी यांच्याकडून एका प्रकरणात लाच मागण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने गुरुवारी सापळा रचून मिटकरी यांना लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली.
दरम्यान, रात्री उशिरापर्यंत दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरु होते. सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे, पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, पोलीस कर्मचारी हिवराज नेवारे, वैभव गाडगे, अमोल सिडाम, पुष्पा काचोळे यांनी केली.