गुवाहाटी (वृत्तसंस्था) दिल्लीहून बिहारमधील गुवाहाटीकडे जाणाऱ्या नॉर्थ-ईस्ट एक्स्प्रेसला बुधवारी रात्री अपघात झाला. ट्रेनच्या सर्व २१ बोगी रुळावरून घसरल्या, त्यात दोन एसी-३ टायर बोगी उलटल्या. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यात दोन पुरुष, एक महिला आणि एका मुलीचा समावेश आहे.
बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील डीडीयू-पटना रेलखंडच्या रघुनाथपूर रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला आहे. अपघाताच्या वेळी ट्रेन ताशी १२० किलोमीटर वेगाने धावत होती. अचानक ब्रेक लागला आणि ट्रेन रुळावरून घसरली. पोल क्रमांक ६२९/८ ला वक्र होता. येथून रेल्वेच्या चार बोगी निघाल्या. त्यानंतर एकामागून एक सर्व बोगी रुळावरून घसरू लागल्या. ही गाडी येण्याच्या अर्धा तास आधी या ट्रॅकवरून पॅसेंजर ट्रेन गेली होती. घटनेची माहिती मिळताच रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी रात्रीच घटनास्थळाचा दौरा केला. या अपघातानंतर ट्रेनमधील प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनने पुढे पाठविण्यात आले आहे. दरम्यान, अपघात का झाला याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.















