धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील बेलदार मोहल्ला भागात किरकोळ वादातून एकाला मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात आवेश खान नासिर खान (वय २० रा. बेलदार मोहल्ला, धरणगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दि. ४ जून २०२२ रोजी ३.३० वाजेच्या सुमारास शकील खान जमाल खान यांच्या घराजवळ त्याचे घराचे अतिक्रमण काढणे चालू होते. त्याठिकाणी यातील आवेश खान उभे असल्याचा शकील खान जमाल खान, रहेमखान जमाल खान, अकीलाबी आसिफ खान, जाफर खान जमाल खान, (सर्व रा. बेलदार मोहल्ला, धरणगाव) या संशयित आरोपींना राग आला. त्यांनी हातात लाठया काठ्या घेऊन आवेश खान व त्यांचे आई- वडील यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी लाठ्या काठ्यांनी हातापायावर, पाठीवर मारहाण केली. तसेच शकील खान जमाल खान यांने त्याच्या हातातील लोखंडी पाईपने आवेश खान यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर मारुन जखमी केले. एवढेच नव्हे तर पाहून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सफौ योगेश जोशी हे करीत आहेत.
















