मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील घरात घुसून तरुणाने फिल्मी स्टाईल २५ वर्षीय तरुणीच्या भांगेत कुंकू जबरदस्ती भरले. एवढेच नव्हे तर सोबत आलेल्या मित्राने या घटनेचा व्हिडीओ बनवला. यानंतर मुलीला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत शारिरीक संबंधासाठी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी मलकापूरच्या दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Muktainagar Crime News)
या संदर्भात पिडीत तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ७ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घरातील किचनमध्ये काम करत होती. यावेळी करण वानखेडे हा पिडीतेजवळ आला व म्हणाला की, तुझ्या डोक्यात कुंकु भरायचे आहे. पिडीतेने त्यास नकार दिला असता करण याने जबरदस्ती करुन पिडीतेच्या भांगेत कुंकु भरले. या घटनेचा व्हिडीओ करण याचा मित्र गणेश इंगळे याने तयार केला. यानंतर करण याने पिडीतेला गळ्यात हात टाकून हसून व्हिडीओ काढण्याचे सांगितले. पिडीतेने भितीपोटी व्हिडीओ काढू दिला. यानंतर करण याने सदरचा व्हिडीओ व चॅटींग मी व्हायरल करेल, अशी धमकी देत शारिरीक संबंधाची मागणी केली. तसेच पिडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करुन विनयभंग केला. या पिडीतेच्या फिर्यादीवरू करण वानखेडे आणि गणेश इंगळे पूर्ण नाव माहीत नाही (रा. मलकापुर जि. बुलढाणा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. उमेश महाजन हे करीत आहेत. (Jalgaon Crime News)
















