अमळनेर (प्रतिनिधी) येथील खा.शि.मंडळाच्या डी. आर. कन्याशाळेत कोरोनाच्या कालावधीनंतर प्रथमच इयत्ता ९ वी व १० वी च्या विद्यार्थीनींचे आगमन झाले.
यावेळी प्रत्येक विद्यार्थिनीचे थर्मल स्क्रिनिंग ने तापमान तपासले तसेच पल्स ऑक्सिमिटर ने ऑक्सिजन तपासून विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले. तसेच प्रत्येक बाकावर एक विद्यार्थीनी बसेल अशी बैठक व्यवस्था करण्यात आली. विद्यार्थिनीना मास्क असेल तरच शाळेत प्रवेश देण्यात आलेला होता. तसेच शाळेत सॅनिटायझर ची व्यवस्था देखील करण्यात आली होती. शाळेच्या मुख्याध्यापिका जे. के. सोनवणे, उपमुख्याध्यापक डी. एच. ठाकुर, पर्यवेक्षिका के. ए. गरुड, पर्यवेक्षक सी. एस. पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधु भगिनी उपस्थित होते.