जळगाव (प्रतिनिधी) विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे स्टिंग ऑपरेशन केल्याचा आरोप असणारा तेजस मोरे हा तरुण जळगावचा असल्याचे नुकतेच समोर आलेय. परंतु धक्कादायक म्हणजे या तेजसवर जळगावात खंडणीचा गुन्हा दाखल असून न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात त्याच्याविरुद्ध आजामीनपात्र वॉरंट जारी केले असल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत ऍड. कुणाल पवार यांनी क्लिअर न्यूज सोबत बोलताना सांगितले की, तेजस विरुद्ध दाखल खंडणीच्या गुन्ह्यात आपण त्याला जामीन मिळवून दिला होता. परंतु मागील काही दिवसापासून तो न्यायालयात हजर राहत नसल्यामुळे 16 फेब्रुवारी 2020 रोजी न्यायालयाने त्याच्या विरुद्ध आजमीनपत्र वॉरंट जारी केले आहे.
तेजस मोरे विरोधात जळगावात असा आहे गुन्हा दाखल
सरकारी वकील अॅड प्रवीण चव्हाण यांची स्टिंग ऑपरेशन करण्याचा तेजस मोरे याच्याविरोधात जळगाव शहर पोलिसांत २१ सप्टेंबर २०१९ रोजी खंडणीचा गुन्हा दाखल आहे .
संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर कॉलनीतील रहिवासी विलास शांताराम आळंदे यांनी याबाबत तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार असे की, तेजस मोरे याने आळंदे यांचा मुलगा स्वप्नील याच्या नावावर ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले. हे पैसे मागू नये म्हणून तेजस याने धीरज पाटील गणेश महाले व सुजाता ठाकुर सर्व रा. जळगाव यांच्या मदतीने विलास आळंदे यांच्याविरूध्द खोट्या तक्रारी व कटकारस्थान केले तसेच वृत्तपत्रात खोटे वृत्त प्रसिद्ध केले. आणि ही सर्व प्रकरणे मिटविण्यासाठी अमोल कोल्हे यांच्या मध्यस्थीतुन तेजस मोरे याने विलास आळंदे यांना पंधरा लाख रुपयांची खंडणी मागितली. या तक्रारीवरून तेजस रवींद्र मोरे ,अमोल कोल्हे, धीरज पाटील, रवी देशमुख, गणेश महाले ,सुजाता संतोष ठाकूर सर्व .जळगाव यांच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात संशयितांना अटकही झाली होती तसेच या गुन्ह्याचे जळगाव जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली आहे.