नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशच्या हापूर (Hapur) मध्ये एक मोठी दुर्घटना घडली. बॉयलरचा स्फोट झाल्याने केमिकल फॅक्टरीत (Chemical Factory) मोठा आवाज होऊन आग लागली. जोरात स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केले. या स्फोटात एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० जण जखमी झाले आहेत.
हापूरचे आयजी प्रवीण कुमार यांनी सांगितले की, इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मितीच्या युनिटमध्ये झालेल्या स्फोटात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 20 जण जखमी झाले आहेत. तर जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधितांवर कारवाई केली जाईल असही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
जिल्ह्यातील धौलाना भागात एक यूपीआयडी कारखाना आहे. तेथे केमिकल बनवले जाते. आज शनिवारी दुपारी अचानक कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. मोठा आवाज होऊन बॉयलर फुटल्याने ही आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले होते. आगीचे उंच लोट पाहून आजूबाजूच्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. अपघातावेळी कारखान्यात सुमारे 25 कामगार काम करत होते. या अपघातात आठ मजूर जिवंत जळाले, तर १५ मजूर गंभीररीत्या भाजले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलही घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहेत.