चाळीसगाव (प्रतिनिधी) अलीकडे जिल्ह्यातील गावो गाव च्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणूक पार पाडल्या जात आहे. चाळीसगाव तालुक्यातील बहाळ या गावाच्या विविध कार्यकारी संस्थेचा निवडणूक निकाल नुकताच जाहीर झाला. संस्थेच्या सभासदांनी यंदा प्रस्थापितांची मक्तेदारी नाकारीत नवं तरूणांच्या “परिवर्तन” पॅनलला पसंती देत निर्विवाद बहुमत दिलेय.
हा निकाल म्हणजे तालुक्याच्या गिरणा क्षेत्रातील परिवर्तनाचीच नांदी म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही. सहकार क्षेत्रात आता जुन्यानां म्हणा की प्रस्थापिताना म्हणा आता ग्रामीण जनता नाकारताना दिसून येत आहे. त्याचेच बहाळ हे उदाहरण होय. गेल्या सतरा वर्षाची या संस्थेतील परंपरा मतदारांनी मोडीत एकूण 13 जागा पैकी 9 जागा कपिल शिवाजी पाटील या तरुणाच्या परिवर्तन पॅनल निवडून देऊन एक नवीन अध्याय निर्माण केला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी कपिल पाटील यांची ही पहिलीच निवडणूक आणि पहिल्याच निवडणुकीत अशी दमदार कामगिरी भविष्याची नवी उमेद जागविणारी तर आहेच पण ग्रामीण भागातील नव्या वाटचालिची ही निदर्शक आहे. कारण बहाळ मधील कपिल पाटील व त्यांच्या टीमची लढत दोन माजी सभापतींच्या सहकार पॅनलशी होती. अतिशय निकराची लढत देऊन “परिवर्तन ” पॅनल ने ही लढत जिंकली आहे.