नागपूर (वृत्तसंस्था) पतीने पत्नीच्या डोक्यात हातोड्याने वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे पत्नीचा खून केल्यानंतर पतीने देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. सोनिया मंडले ( ३८ वर्ष), असे खून झालेल्या पत्नीचे तर आरोपी पतीचे नाव राजेश मंडले (४५ वर्षे, मॉयल कॉलनी, छावणी) असे आहे.
अमित अशोक यादव (३३, रा. वाहीटोला, वॉर्ड नं. २, ग्रामपंचायत शीतलवाडी परसोडा, ता. रामटेक जि. नागपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची बहीण सोनिया राजेश मंडाले (३७) या पती राजेश खेमचंद मंडाले (४८) व वैष्णवी उर्फ मिनी (१४) यांच्यासोबत सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिल्डिंग नं. ए/३, क्वॉर्टर नं. ३१, चौथा माळा, मॉयल कर्मचारी वसाहत, छावणी येथे राहत होत्या. त्या मॉयल कार्यालयात लेबर म्हणून काम करीत होत्या. त्यांचे पती राजेश यांना तीन ते चार वर्षांपासून तोंडाचा कॅन्सर असल्याने ते कामधंदा करीत नव्हते आणि घरीच राहत होते.
चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. २ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास राजेश मंडाले यांचा पत्नीशी याच कारणावरून वाद झाला. यानंतर त्याने त्यांनी हातोडा डोक्यावर मारून पत्नीला ठार मारले. त्यानंतर त्यांनी स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. मुलगी वैष्णवी उर्फ मिनी हिला वरील प्रकार दिसल्याने तिने मामला फोनवरून कळविले. तसेच तिने नातेवाईक व शेजारच्यांनाही या प्रकाराची माहिती दिली. सदर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून पती-पत्नीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयोमध्ये पाठविले.
दरम्यान, सोनियाचा नववीत गेलेल्या मुलीवर फार जीव होता. रात्री आईशी गप्पा मारून ती झोपली व सकाळी १० वाजण्याच्या सुमारास वीज गेल्यामुळे ती झोपेतून उठली. त्यानंतर तिने आईला हाक मारली. यावेळी काहीच उत्तर आले नाही. त्यामुळे ती बेडरूममध्ये गेली. यावेळी तिला तिचे वडील लटकलेले आणि आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. ती जोरात ओरडली. त्यामुळे शेजाऱ्यांनी लगेच धाव घेतली. मुलीने बघितलेल्या भयंकर दृश्यानंतर तिला मोठा मानसिक धक्का बसला आहे. तर आता तिथे काय होणार, ही चिंता तिच्या नातेवाईकांना सतावते आहे.
सोनिया ही मॉडल येथील प्रयोगशाळेत कार्यरत होती. पतीच्या उपचारासाठीच तिने नागपुरात बदली घेतली होती. मूळचा शीतलवाजी येथील राजेश हा फार अगोदर खाणीतच कामाला होता. मात्र, त्यानंतर त्याला हृदयाचा त्रास झाल्याने त्याने काम सोडले. चार वर्षाअगोदर त्याला तोडाचा कर्करोग झाला. त्याच्यावर केमोथेरपी सुख होती. मात्र, त्याच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नव्हती. त्यामुळे तो घरीच असायचा. त्याचे अगोदर एक लग्न झाले होते. मात्र, त्याचे सोनियावर प्रेम जडले व पहिल्या पत्नीला सोडून त्याने सोनियाशी लग्न केले होते. मागील चार वर्षांपासून घरीच असल्याने तो सातत्याने तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यातून त्यांच्यात अधेमधे वादावादीदेखील होत होती, अशी माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली.