चोपड़ा (लतीश जैन) आज जागतिक महिला दिवस होता त्याचे औचित्य साधून चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्तनपान करण्यासाठी हिरकणी कक्ष स्थापन करून महिलांबद्दल एक सन्मान प्रस्थापित केल्या आहे. त्या अनुषंगाने आज चोपडा नगर परिषदेने महिलांना सोयीचे असे स्तनपान करण्यासाठी हिरकणी कक्षाचे उद्घाटन आयोजित केले होते.
या उद्घाटनाप्रसंगी मुख्य अधिकारी राहुल पाटील यांनी महिलांना उद्देशून सांगितले की, महिला दिन साजरा करणे म्हणजे केवळ शुभेच्छा देणे नव्हे तर स्त्रियांचा सन्मान किंवा त्यांचा आदर आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल सन्मान करण्याचा दिवस म्हणजे महिला दिवस. तरी मी महिलांना याप्रसंगी सांगू इच्छितो की महिलांनी महिलांनी केवळ आपल्या कुटुंबापर्यंत मर्यादित न राहता त्यांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय, प्रशासकीय अशा सर्व क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेतली पाहिजे. मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनानंतर महिलांना बेबी किट वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात महिलांचा सन्मान किंवा जागर व्हावा याकरिता कर अधिकारी संदीप गायकवाड यांनी एक महिलांच्या सन्मान सन्मानार्थ एक कविता सादर केली. तसेच स्वच्छता निरीक्षक दिपाली साळुंखे यांनी महिलांना संबोधले. महिलांनी संघर्ष करावा मोठी मोठी स्वप्न पहावेत आणि ती पूर्ण करण्यासाठी किंवा ती सत्यात उतरण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न करून समाजामध्ये एक प्रतिष्ठान निर्माण करावी. तदनंतर हिरकणी कक्ष याचे उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महिला व मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेने पार पाडण्यात आला.
या हिरकणी कक्षामध्ये महिलांना बसण्यासाठी एक दिवा दिव्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे त्यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी तसेच म्युझिक पाळणा बसवण्यात आलेले आहे. हिरकणी कक्ष हा हवा खेळती रहावी, याकरिता व्हेंटिलेशन त्याचप्रमाणे पंख्यांची ,कुलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हिरकणी कक्ष हा अतिशय बोलका व्हावा याकरिता हिरकणी कक्षामध्ये पूर्णतः सुंदर अशी कार्टून युक्त रंग पेंटिंग करण्यात आलेली आहे. तसेच हिरकणी कक्षा बाहेरील वातावरण हे उल्हासदायिक असावं याकरिता बाहेरील आवारात देखील पेंटिंग करून त्यावर महिलांना हिरकणी कक्षा दरम्यान काही तक्रारी उद्भवल्यास त्या तक्रारींकरिता संपर्क क्रमांक व अधिकाऱ्यांची नावे असलेला बॅनर ठेवण्यात आलेला आहे. त्याचसोबत महिलांना लहान बाळांसाठी लसीकरणाचा वेळापत्रकाचं ज्ञान व याकरिता लसीकरण चे बॅनर देखील अवगत करण्यात आलेले आहे.
सदर कार्यक्रमाप्रसंगी हिरकणी कक्ष स्थापन केल्याबद्दल अधिकारी यांचे आभार महिलांनी मांडले व धन्यवाद दिले. हा केवळ एक हिरकणी कक्ष नसून महिलांना देण्यात आलेला एक सन्मान आहे असे सांगितले. यामध्ये मुख्याधिकारी यांनी अशा व्यक्त केली की, हा हिरकणी कक्ष स्थापन केल्यानंतर महिलांनी याचा उपयोग करावा त्याचप्रमाणे नगर परिषदेत येणाऱ्या महिला असतील किंवा ऑफिसमध्ये काम करणारे महिला असतील अशा सर्व महिलांनी हिरकणी कक्षाचा वापर करावा असे सांगितले. कार्यक्रमात लेखापरीक्षक मुकेश परदेशी व गणेश पाठक यांनी सूत्रसंचालन केले.