वणी / यवतमाळ (वृत्तसंस्था) चुनाभट्टीवर काम करणाऱ्या एका ५० वर्षीय महिलेला मजुरांच्या निवाऱ्यातून उचलून नेत अपहरण करून तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना वणी तालुक्यातील एका गावात घडली आहे. २८ जूनला सायंकाळी पाच ते रात्री अकरा या दरम्यान ही संतापजनक घटना घडली.
गुरुवारी रात्री या प्रकरणातील चारही आरोपींना वणी पोलिसांनी अटक केली. विठ्ठल ज्ञानेश्वर डाखरे (३९, रा. टागोर चौक), कपिल व्यंकटेश अंबलवार (३५, रा. जैताई नगर), मनोज अजाबराव गाडगे (४७, रा. रामपुरा वार्ड), वैभव घनश्याम गेडाम (२२, रा. आयटीआयजवळ लालगुडा) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींविरुद्ध भादंवि ३५४, ३५४ (अ), (१) (एक), ३६६, ३७६ (ड), ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच अॅट्रॉसिटीचेही कलम लावण्यात आले आहे.
वणी तालुक्यातील राजूर कॉलरी येथील एका चुना भट्टयावर काम करणारी ५० वर्षीय महिला कामगारांकरिता बांधण्यात आलेल्या निवाऱ्यात रहात होती. अश्यात बुधवारी सायंकाळी चार जण मजुरांच्या वस्तीत गेले. आरोपींपैकी विठ्ठल डाखरे याचे पीडित महिलेच्या मुलाकडे पैसे होते, ते मागण्यासाठी विठ्ठल डाखरे व त्याचे अन्य तीन सहकारी बुधवारी सायंकाळी राजूर कॉलरी येथील चुनाभट्टी परिसरात गेले होते. यावेळी पीडिता घरी होती. तिने मुलगा घरी नसल्याचे सांगितले. यानंतर चौघां आरोपींनी तुझा मुलगा कुठे आहे ते आम्हाला दाखव, असे म्हणून तिला बळजबरी जबरदस्ती ओढत नेत कारमध्ये बसविले.
संशयित आरोपींनी सुरवातीला कार वणी मुकुटबन बियरवारसमोर थांबवून मनसोक्त मद्यप्राशन केले. यानंतर त्यांनी पिडीतेलाही जबरदस्ती दारू पाजण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार खडकी (बुरांडा) वस्न करणवाडीमार्गे नवरगावला नेऊन शेत शिवारात या महिलेवर अतिप्रसंग करण्यात आला. या महिलेसोबत अनैसर्गिक कृत्य देखील करण्यात आल्याचे समोर आले आहे. महिलेने कशीबशी आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेत पोलिस ठाणे गाठले.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जलद तपासचक्रे फिरवून अवघ्या काही तासांतच चारही आरोपींना बेड्या ठोकल्या. या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, पिडीत महिलेच्या मुलाशी यातील एका आरोपीचे आर्थिक व्यवहार होते. त्याच्या शोधात तो आपल्या सहकाऱ्यांना घेऊन मजुरांच्या वस्तीत गेला. त्यावेळी त्याची आई घरी होती. तिने मुलगा घरी नसल्याचे सांगितले. पण आरोपींची महिलेवरच नियत फिरली. त्यांनी त्या ५० वर्षीय महिलेला जबरदस्ती कारमध्ये बसवून नवरगाव शेत शिवारात नेत तिच्यावर अतिप्रसंग केला.