जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस भरतीची प्रक्रीया राबविली जात आहे. जिल्ह्यात १३७ जागांसाठी ६ हजार ५५७ अर्जदार पात्र ठरले असून दि. १९ जून पासून शारीरिक चाचण्यांना सुरुवात होणार असून दि. २५ जूनपर्यंत चाचण्या पूर्ण होतील. यातील उत्तीर्ण उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. शारिरीक चाचणीच्या अचून नोंदीसाठी जिल्ह्यात पहिल्यांदाच इलेक्ट्रॉनिक्स चीपचा वापर केला जाणार असून त्यामुळे वेळेत थोडीदेखील तफावत राहणार नसल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिस भरतीची माहिती देण्यासाठी शनिवारी पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. जिल्ह्यात १३७ जागांसाठी पोलीस भरती होत असून त्यासाठी दि. १९ जूनपासून शारिरीक चाचण्यांना सुरुवात होणार आहे. त्यासाठी पहाटे साडेचार वाजता उमेदवारांना पोलीस कवायत मैदानाजवळ हजर रहावे लागणार आहे. पहिल्या दिवशी म्हणजेच दि. १९ रोजी ५०० पुरुष उमेदवार, दुसरा दिवस २० जून जून दरम्यान प्रत्येक दिवशी ते २३ एक हजार उमेदवारांना तर दि. २४ रोजी ७२४ उमेदवारांना चाचणीसाठी बोलविले जाणार आहे. त्यानंतर दि. २५ जून रोजी एक हजार ३६२ महिला उमेदवार व एक तृतीय पंथीय उमेदवारांची शारिरीक चाचणी होणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
डॉक्युमेंट तपासणीनंतर मिळणार चेस्ट क्रमांक !
प्रत्येक दिवशी आलेल्या उमेदवारांना प्रथम वाहतूक शाखेनजीक बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तेथे अर्ज भरल्यानंतर ५०-५० जणांना पुढे पाठविले जाईल. तेथे उंची, छाती, छाती फुगवणे यांची मोजणी होईल. त्यात जो उत्तीर्ण होईल, त्यालाच पुढे पाठविले जाणार आहे. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होऊन मूळ कागदपत्रे (ओरिजनस डॉक्युमेंट) जमा करण्यात येणार आहे. तेथून पुढे बायोमेट्रीक फिंगरप्रिंट घेऊन त्यांना चेस्ट क्रमांक दिला जाणार आहे.
प्रलोभलांना बळी पडू नका
पोलीस भरतीची संपुर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत केली जाणार आहे. यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप राहणार नाही. पोलिस भरतीसाठी उमेदवारांना कोणी मदत करणार असल्याचे सांगत असेल तर त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये व त्यांच्या प्रलोभलांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.
अर्जामध्ये २० टक्के महिलांचा समावेश !
भरती प्रक्रियेविषयी काही तक्रार असल्यास त्याची पहिले अपील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करता येईल. त्यानंतर दुसरे अपील पोलिस अधीक्षकांकडे करता येऊ शकते. भरतीसाठी ऑनलाईन स्वीकारण्यात आले असून प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध केले असून एकूण अर्जामध्ये २० टक्के महिलांचा समावेश आहे. जे उमेदवार चाचणीमध्ये उत्तीर्ण होऊन