TheClearNews.Com
Saturday, February 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नागरिकांचे आरोग्य सदृढ, निरोगी राहण्यासाठी गाव सातत्याने हागणदारी मुक्त असावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 22, 2023
in आरोग्य, जळगाव, जिल्हा प्रशासन, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पाणी, स्वच्छता आणि आरोग्य हे आपल्या वैयक्तिक आणि सामूहिक जीवनातील तीन महत्त्वाचे घटक आहेत. स्वच्छता ही काळाची गरज असून लोकसहभाग ही तितकाच महत्त्वाचा आहे. ग्रामसभा ही केवळ प्रबोधनासाठी उपलब्ध साधन नसुन ती गावाला दिशा देणारी विशेष सभा आहे. तसेच गाव स्वच्छतेसाठी ” ग्रामसभा ” प्रभावशाली साधन असून नागरिकांचे आरोग्य सदृढ, निरोगी राहण्यासाठी गाव सातत्याने हागणदारी मुक्त असावे. त्यासाठी सुंदर, स्वच्छ गावची ओळख निर्माण करण्यासाठी नागरिकांनी समाजाप्रती आपले निरंतर कर्तव्य पार पाडावे . असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे केले.

राज्यात एकाच वेळेस २८ हजार ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा पार पडत आहेत. जळगाव जिल्ह्यातील ग्रामसभांची सुरूवात आज पाळधी बुद्रुक व खुर्द ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेतून झाली. त्यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. या विशेष ग्रामसभेला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पाळधी बु. सरपंच विजय पाटील, उपसरपंच राहुल धनगर, पाळधी खुर्द सरपंच लक्ष्मीबाई कोळी, उपसरपंच भारतीताई पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक बी. एस. कोसोदे, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, महिला बाल विकास अधिकारी संजय धनगर, सहाय्यक गटविकास अधिकारी कैलास पाटील, बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री वंजारी, पाणीपुरवठ्याचे उप अभियंता श्री बोरकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, संजय महाजन, ग्रामविकास अधिकारी पाठक यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य , अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

READ ALSO

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, संपर्ण ग्रामीण महाराष्ट्र सन २०१८ मध्येच हागणदारी मुक्त म्हणून जाहीर करण्यात आला होता. तथापि सन २०१८ नंतर राज्यातील ग्रामीण भागात नवीन कुटुंबाची वाढ झाली असल्याने नव्याने वाढलेल्या ठिकाणी वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय शासन स्तरावरून करून देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांसाठी कार्यशाळा घेण्यात यावी. अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या. ग्रामस्थांनी वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने सर्वांनी सहभाग द्यावा. असे आवाहन ही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, ग्रामसभांना विशेष महत्त्व आहे. या ग्रामसभांच्या माध्यमातून गावातील शौचालयांचा लाभापासून वंचित लाभार्थ्यांना लाभ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाळधी गावला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या काम पूर्णत्वास गेले आहे. दीड महिन्याच्या आत पाळधी ग्रामस्थांना शुध्द पाणी मिळणार आहे. गावाला धूळ, कचरा व हागणदरीमुक्त करण्यासाठी ग्रामसभांनी विशेष प्रयत्न करावेत. असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित म्हणाले की, जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रत्येक गावातील प्रत्येक घरात शौचालय असणे गरजेचे आहे. स्वच्छता असणे गरजेचे आहे. सध्या जिल्ह्यात कोवीड केसेस वाढत आहेत. वैयक्तिक आरोग्य व स्वच्छतेवर प्रत्येकाने भर दिला पाहिजे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे वारस वंदना सुकलाल पाटील (अनोरे), प्रतिभा धोंडू इंगळे, (साळवा), शोभा रमेश पाटील (तरडे) यांना प्रत्येकी एक लाख रूपयांच्या धनादेशाद्वारे शासकीय मदत देण्यात आली. तसेच यावेळी आयुष्यमान कार्डाचे प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. तसेच कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत धरणगाव तालुक्यातील पन्नास पात्र लाभार्थ्यांची (प्रत्येकी तीस हजार रूपयांची) प्रकरणे यावेळी पालकमंत्र्यांनी मंजूर केली आहेत. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहायक गटविकास अधिकारी कैलास पाटील यांनी केले . आभार पाळधी बुद्रुक सरपंच विजय पाटील, पाळधी खुर्द सरपंच लक्ष्मी कोळी यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
जळगाव

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा

February 20, 2026
गुन्हे

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

February 20, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

भुसावळ बाजारपेठचा एक पोलीस कर्मचारी निलंबित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सरकारचा अलर्ट ! ताबडतोब अपडेट करा Google Chrome ब्राउजर ; अन्यथा होईल मोठे नुकसान

January 10, 2022

जैन हिल्स येथे पोळा उत्साहात

August 23, 2025

जळगावात ‘आत्मोत्कर्ष चातुर्मास’चा मंगल प्रवेश उत्साहात

July 4, 2025

पोलीस असल्याची बतावणी करत महिलेची फसवणूक ; तिघांनी लंपास केले 1 लाखांचे सोन्याचे दागिने !

July 22, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group