चोपडा प्रतिनिधी – शहरात आज झालेल्या महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीत माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हा प्रवेश चोपडा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाला.
या कार्यक्रमाला जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक रोहित निकम, माजी नगराध्यक्ष जीवन भाऊ चौधरी, भाजप जळगाव पूर्वचे महामंत्री राकेश पाटील, उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, तालुका अध्यक्ष कांतीलाल पाटील आणि शहराध्यक्ष नरेंद्र पाटील आदींची उपस्थिती होती.
या वेळी रोहित निकम म्हणाले, “भाजपच्या विचारसरणीवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’च्या ध्येयावर नागरिकांचा वाढता विश्वास दाखवतो की चोपड्यात विकासाच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे. अनुभवी नेतृत्व आणि तरुण ऊर्जेचा संगम आगामी निवडणुकीत निश्चितपणे सकारात्मक बदल घडवेल.”
















