धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील अनेक मुस्लीम वस्त्यांचे विभाजन करण्यात आले असून प्रत्येक प्रभागात मुस्लीम समाज विभागून राजकीय फायद्याच्या दृष्टीने प्रभाग रचना तयार करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक राजू शेख यांनी केला आहे.
रियाजोद्दीन शे.लाडजी, (माजी नगरसेवक, बेलदार मोहल्ला) यांनी घेतलेल्या हरकतीत म्हटले आहे की, प्रभाग क्र. ११ मधील बेलदार मोहल्ला हा भाग तीन भागात विभागाला गेला आहे. ज्यात बेलदार मोहल्ल्याचे वर्गीकरण प्रभाग क्रमांक ९, प्रभाग क्रमांक १० व प्रभाग क्रमांक ११ अश्या पद्धतीने हेतुपुरस्कर प्रभाग विभागाला गेला आहे.
मुस्लीम समाजाच्या उमेदवाराला निवडून येता येवू नये, यासाठी मुद्दामहून प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. असे झाल्यास हा मुस्लीम समाजावर अन्याय होईल. मुस्लीम समाजाचे प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती नगरपालिकेत निवडून येणार नाही. आमचा भाग हा गरीब वस्ती असलेला असून आमच्या भागात मोठ्या समस्या असतात. या समस्या दूर करण्यासाठी मुस्लीम समाजाचे प्रतिनिधी धरणगाव नगरपालिकेत निवडून येणे महत्वाचे आहे.
प्रभाग रचना जर ब्लॉक नुसार करण्यात आली तर निश्चितच कुणावरही अन्याय होणार नाही. म्हणून प्रभाग रचना ब्लॉक नुसार करण्यात यावी अशी मागणी मी याद्वारे करीत आहे. मुस्लीम समाजाच्या जणगणनेचा विचार होवून मुस्लीम समाजाच्या हिताच्या दृष्टीने योग्य तो विचार व्हावा. प्रभाग रचनेत राजकीय अस्ताक्षेप झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. राजकीय हेतूने प्रेरित अशी प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे.
प्रत्येक प्रभागात रस्त्यांचे, गल्ल्यांचे, भागाचे विभाजन करण्यात आलेले आहे. आमच्या न्यायाच्या व हिताच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा. जेणेकरून आमच्यावर अन्याय होणार नाही. अन्यथा न्याय मागण्यासाठी आम्हाला योग्य त्या न्यायालयात दाद मागावी लागेल, असेही राजू शेख यांनी आपल्या हरकतीत म्हटले आहे.