पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांनी आज दोनगाव येथील नवीन पुलाचे बांधकाम कामाची पाहणी केली.
दोनगाव बु व खु या दोघी गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम नुकतेच सुरू झाले आहे. कामाची प्रगती नेमकी कुठंपर्यंत पोहोचली, हे बघण्यासाठी आज माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी दोनगाव येथे भेट दिली. तसेच कामाची पाहणी केली. या कामाची अंदाजित किंमत 69 लाख तसेच दोनगाव येथील नीलकंठेश्वर महादेव मंदिर सभागृह 25 लाख रुपये, अशी आहे. या वेळी किशोर राघो पाटील, भूषण पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते.