जामनेर (प्रतिनिधी) श्रीरामपूर येथील अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित माजी नगराध्यक्ष पारस ललवाणींसह इतरांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर आज न्यायाधिश सी. व्ही. पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. यात ललवाणींसह इतरांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. तर यात अभियांत्रीकीचे शिक्षण घेणार्या एकाला मात्र वगळण्यात आले आहे.
सरकार पक्षाकडून सहायक सरकारी वकील मोहन देशपांडे यांनी बाजू मांडली. पीडितेकडून अकिल इस्माइल यांनी बाजू मांडली.
जामनेर येथील माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्यासह इतरांवर पोक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पीडितेच्या इच्छेविरुद्ध लग्न लावणे, विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा पोस्कोतर्गत जामनेर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.