अमळनेर (प्रतिनिधी) माजी आ. कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत महावितरणचे कृषिपंपांचे बिल भरली. याचाच भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कृषिपंप वीज जोडणी धोरण २०२० मध्ये माजी आ. साहेबराव पाटील यांना एक जागरूक कृषिपंप वीज ग्राहक म्हणून सहभागी झाल्याबद्दल व वीज देयक थकबाकी भरून महावितरणला सहकार्य केल्याबद्दल त्यांना सन्मानित केले. डॉ. नरेंद्र गीतेसह व्यवस्थापक संचालक महावितरणयांच्या कडून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.