नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांकडून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे. ८८ वर्षीय मनमोहन सिंग यांनी कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.
डॉ. सिंह हे डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांच्या तपासण्या सुरू आहेत. त्यांनी नवे औषध घेतल्यानंतर त्यांच्या शरीरात काही प्रमाणात रिअॅक्शन झाली होती. त्यानंतर ताप येऊ लागला, असे सूत्रांनी सांगितले. ८८ वर्षीय डॉ. सिंह यांना रविवारी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. डॉ. सिंह यांच्या शरिरात औषधाचे रिअॅक्शन कसे झाले. त्यांना ताप येण्याची आणखी काही कारणे आहेत का, याचीही तपासणी करण्यात येत आहे.
डॉ. मनमोहन सिंह हे राज्यसभेचे सदस्य आहेत. ते राजस्थानमधून राज्यसभेवर आले आहेत. ते सन २००४ ते २०१४ या कालावधीत देशाचे पंतप्रधान होते. डॉ. सिंग यांच्यावर हृदयाची यशस्वी बायपास सर्जरी करण्यात आली होती. डॉ. सिंह यांची प्रकृती लवकरात लवकर ठणठणीत व्हावी अशा सदिच्छा अनेक नेत्यांनी दिल्या आहेत.