TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पावसाळ्यात वीजयंत्रणा, उपकरणांपासून सावधान ; महावितरणचे नागरिकांना आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 7, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पाण्यामुळे ओली झालेली कोणतीही वस्तू ही वीजवाहक आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी असलेली वीजयंत्रणा किंवा घरगुती उपकरणे तसेच शेतीपंप, स्विच बोर्ड, पत्र्याची घरे, जनावरांचे गोठे आदींपासून वीज अपघात टाळण्यासाठी सदैव सावध व सतर्क राहण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

पावसाळ्यात वीजयंत्रणेच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक वस्तूपासून सावध राहणे आवश्यक आहे. विहिरीतून किंवा नदीपात्रातून शेतीपंप बाहेर काढणे, स्विच बोर्ड व वायर्स हाताळणे, घराबाहेरील पत्र्याच्या शेडमध्ये साध्या वायर्समधून वीजपुरवठा घेणे तसेच तुटलेल्या वीजतारा, खाली पडलेले वीजखांब आदींना हटविण्याचा प्रयत्न करणे, ओल्या लाकडी काठ्या किंवा लोखंडी वस्तूंच्या साह्याने वीजयंत्रणेच्या संपर्कात येणे अशा अनेक गोष्टींमुळे वीज अपघातांचा धोका असतो.

READ ALSO

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 ऑगस्ट 2026 !

घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. घरातील विशेषतः पत्र्याच्या शेडमध्ये व जनावराच्या गोठ्यामध्ये असलेल्या वीजयंत्रणेचे आवश्यक अर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी. घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेन स्विच तात्काळ बंद करावा. घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावा. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्विचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारी सर्व उपकरणे स्विच बोर्डपासून बंद करावीत. विशेषतः टिनपत्र्याच्या घरात राहणार्‍या नागरिकांनी पावसाळ्यात दक्ष राहून विद्युत सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात. याशिवाय विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत व त्यास दुचाकी टेकवून ठेवू नयेत. विद्युत खांबांना लोखंडी तार बांधून कपडे वाळत घालू नयेत.

यासोबतच सार्वजनिक वीजयंत्रणेपासून सावध राहावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पिलर, रोहित्राचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेली विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्विच बोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता असते. सावधगिरी बाळगल्यास या दुर्घटना टाळता येतात. पाऊस आणि वार्‍याने झाडाच्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. वीजखांब वाकतो व वीजतारा तुटतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तारांपासून सावध राहावे. तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये. ग्रामीण भागात शेतात किंवा रस्त्याने जाताना विशेषतः पहाटे किंवा सायंकाळी चांगल्या दर्जाच्या टॉर्चचा वापर करावा. शेतामधून किंवा रस्त्यामध्ये तुटून खाली पडलेल्या विजेची तार कुठल्याही परिस्थितीत हटविण्याचा किंवा तारेजवळ जाण्याचा प्रयत्न करू नये. वीजयंत्रणेपासून धोका निर्माण झाल्याची शक्यता वाटल्यास किंवा शंका आल्यास नागरिकांनी ताबडतोब महावितरणच्या जवळच्या कार्यालयाशी अथवा २४ तास सुरू असणाऱ्या १९१२, १८००-१०२-३४३५, १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

वीजपुरवठा खंडितची तक्रार करा ‘मिस कॉल’ व ‘एसएमएसवर

वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार ‘मिस कॉल’ व ‘एसएमएस’ करून नोंदविण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी ०२२-४१०७८५०० हा क्रमांक देण्यात आला असून महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. नोंदणीकृत मोबाइलऐवजी इतर क्रमांकावरून ०२२-४१०७८५०० या क्रमांकावर ‘मिस कॉल’ दिल्यानंतर मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची प्रक्रिया समजावणारा ‘एसएमएस’ पाठविण्यात येईल. नोंदणी करावयाच्या मोबाईलवर MREG टाईप करून त्यानंतर एक स्पेस देऊन आपला बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करावा व ९९३०३९९३०३ या क्रमांकावर ‘एसएमएस’ पाठवावा. या एका ‘एसएमएस’द्वारे तसेच www.mahadiscom.in या संकेतस्थळावरील कंज्युमर पोर्टल, महावितरणचे मोबाईल ऍप अथवा १८००-२३३-३४३५, १८००-१०२-३४३५, १९१२ या टोल-फ्री क्रमांकांवर फोन करून मोबाईल क्रमांक नोंदविता येतो. याशिवाय NOPOWER टाईप करून त्यानंतर स्पेस देऊन बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करून ९९३०३९९३०३ या क्रमांकावर ‘एसएमएस’ पाठवून खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करता येईल. स्वयंचलित प्रणालीद्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदवून तक्रार नोंदणी क्रमांक ग्राहकांना पाठविण्यात येईल. संबंधित क्षेत्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना या तक्रारीचे निराकरण करण्याची सूचना स्वयंचलित प्रणालीमार्फत दिली जाईल. या सूचनेनुसार संबंधित भागातील वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. याशिवाय मोबाईल ऍप व टोल फ्री क्रमांकावर खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करण्याची सुविधा अबाधित आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 ऑगस्ट 2026 !

August 29, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2026 !

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
Next Post

जि.प., पं.स.च्या आरक्षण सोडतीसाठी १३ रोजी सभा ; ७७ गट, १५४ गणांचे आरक्षण काढण्यात येणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोगस प्रमाणपत्राने मिळवली सरकारी नोकरी ; दोन वर्षांनी फुटले बिंग, एका खेळाडूला अटक !

September 26, 2021

तेव्हा पंतप्रधान मोदी कोणत्या जेलमध्ये होते, याची माहिती स्वत: त्यांनी द्यावी : जयंत पाटील

March 29, 2021

रब्बी हंगामातील शासकीय हमीभावाने ज्वारीची नोंदणी करून खरेदी केंद्र सुरु करा !

April 21, 2024

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

June 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group