कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) एरंडोल तालुक्यातील कासोदा सर्वात मोठी ग्रामपंचायत यात १७ उमेदवार निवडून येतात. यासाठी एकूण सहा वार्डात विभागणी करण्यात आलेली आहे. तसेच आजी-माजी सरपंच व सदस्यांची मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे.
२३ डिसेंबर ते ३० डिसेंबर पर्यंत फॉर्म भरणे सुरू होणार असल्याने निवडणुकीसाठी आजी-माजी ग्रामपंचायत सरपंच यांसह सदस्य इच्छुक आहेत. त्यामुळे निवडणुकीत फार मोठी चुरस निर्माण होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंच निवडीचे आरक्षण निघणार असल्याने आताच सरपंच कोण ? याबाबत साऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी आरक्षण काय निघेल ? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असल्यामुळे काही आजी माजी सरपंच पती, पत्नी, आई, वडील, जनरल, ओबीसी अशा प्रत्येक ठिकाणी एकाच घरातून दोन किंवा तीन उमेदवारी दाखल करता येणार आहे. व त्यामुळेच गावात निवडणुकीत अत्यंत चुरस निर्माण होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांची सरपंच निवडणुकीत सरपंचहा आपल्याच बाजूचा व्हावा यासाठी ही मोर्चेबांधणी वार्डात सुरू केलेली आहे. यामुळे ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचेही अनेक मतदार चर्चा करताना दिसत आहेत.