अहमदनगर (वृत्तसंस्था) माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते दिलीप गांधी यांचे निधन झाले आहे. ते ६९ वर्षांचे होते. कोरोनाची लागण झाल्याने गांधी यांची प्रकृती अत्यवस्थ होती. त्यांच्यावर दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दिलीप गांधी यांचा करोना अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला. यानंतर श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने कालपासूनच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप गांधी हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे माजी खासदार होते. सुरुवातीला नगरसेवक म्हणून अहमदनगर महानगरपालिकेत त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. नंतर ते नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाचे नेते झाले. १९८५ मध्ये ते अहमदनगर महानगरपालिकेचे उपाध्यक्ष झाले. भाजपच्या अहमदनगर जिल्हा संघटनेत सरचिटणीस, सहसचिव आणि अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
दिलीप गांधी यांचा कोरोना रिपोर्ट काल पॉझिटिव्ह आला होता. दिलीप गांधी हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे माजी खासदार होते. सुरुवातीला नगरसेवक म्हणून अहमदनगर महानगरपालिकेत त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांतर त्यांची पालिका नेता म्हणून निवड झाली. 1985 मध्ये ते अहमदनगर महानगरपालिकेचे उपाध्यक्ष झाले. भाजपच्या अहमदनगर जिल्हा संघटनेत सरचिटणीस, सहसचिव आणि अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. दिलीप गांधी १९९९ मध्ये अहमदनगर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. २९ जानेवारी २००३ ते १५ मार्च २००४ या कालावधीत ते केंद्रीय जहाज वाहतूक मंत्री होते.
पुन्हा लोकसभेवर
२००९ मध्ये दिलीप गांधी पुन्हा अहमदनगरमधून लोकसभेवर निवडून गेले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ते दोन लाखांहून अधिक मतांच्या फरकाने पुन्हा निवडून आले होते. त्यानंतरच्या २०१९च्या निवडणुकीत दिलीप गांधी यांना उमेदवारी न देता काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली. यावेळी दिलीप गांधी नाराज असल्याच्या चर्चा होत्या. राधाकृष्ण विखे पाटील यांनी गांधी यांची भेट घेऊन मनोमीलन केल्याचे सांगितले जाते. दरम्यान, सुजय विखे यांनी लोकसभेची जागा भाजपकडे राखण्यात यश मिळवले.