भुसावळ (प्रतिनिधी) मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील यात्रोत्सवात अल्पवयीन मुलींच्या छेड काढल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील चार संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांना भुसावळ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दि. ५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन असून त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. बाकीचे तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावचे मुक्ताबाई यात्रेत फराळ वाटपाच्या कार्यक्रमाच्या वेळी संशयित आरोपी अनिकेत भोई याने दि. २४ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेचे सुमारास अल्पवयीन मुलींकडे बघून अश्लील हातवारे केले होते. यानंतर पीडित युवती व तिच्या मैत्रिणी दि. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे नऊ वाजेचे सुमारास कोथळी गावातील मुक्ताबाई यात्रेत फिरत असतांना संशयित आरोपी अनिकेत भोई, पियुष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील, किरण माळी, चेतन भोई, सचिन पालवे अशांनी पीडित युवती व तिच्या मैत्रिणीं अशांचा जाणीवपूर्वक पाठलाग करून गर्दीचा फायदा घेऊन संशयित आरोपी अनिकेत भोई याने पीडित युवतीस लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे स्पर्श केला व पीडित युवती व तिच्या मैत्रिणी त्यांच्या कडील मोबाईल मध्ये व्हिडिओ काढला होता. म्हणून मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता सह बाल लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे. यात एकूण सात संशयित आरोपींचा समावेश आहे. पोलिसांनी संशयित आरोपी अनिकेत भोई, अनुज पाटील, लोकेश ऊर्फ किरण माळी अशांना दि. ३ मार्च रोजी दुपारी पावणे दोन वाजेचे सुमारास अटक केली मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक मोहिते यांनी गुन्ह्यातील संशयित आरोपीना भुसावळ न्यायालयातील विशेष सत्र न्यायालय एल.डी. गायकवाड यांचे न्यायालयात हजर केले. सरकारी वकील संजय दामोदर सोनवणे यांनी कामकाज पाहिले. न्यायालयाने दोघे बाजूंचा युक्तिवाद ऐकून तिघेही संशयित आरोपीकडून चित्रीकरण केलेला मोबाईल हस्तगत करण्यासाठी त्रिकुटांना ५ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.