जळगाव (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील मारवड येथून चाेरी केलेल्या 918 किलाे वजनाच्या 17 लाेखंडी प्लेटा कारमधून घेवुन जाणाऱ्या चाैघांना जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मारवाड पोलिसात दि. २९ डिसेंबर रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी संशयित आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे. ज्ञानेश्वर सोपान कोळी (वय 27), मिथुन निरामन गोसावी (वय 36), लखन एकनाथ सपकाळे (वय 30), विष्णू श्रीधर कोळी(वय 37, सर्व रा. शेळगाव तालुका जिल्हा जळगाव)असे संशयित आरोपींचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील पाडळसरे निम्नं तापी प्रकल्पातील साडेचार लाखांच्या लोखंडी प्लेटा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी मारवड पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार पोलिस हवालदार गणेश पाटील व पोलिस शिपाई समाधान पाटील यांना मानराज पार्क या ठिकाणाहून (एमएच 19 क्यू 4760) ही निळ्या रंगाची टाटा इंडिका गाडी संशयितरित्या भरधाव वेगात जाताना दिसली. त्यांनी गाडी थांबवून अधिक चौकशी केली.
टाटा इंडिका गाडीमध्ये लोखंडी प्लेटा व चार जण हाेते. गाडीमधील लोखंडी प्लेटां हाेत्या. त्या कुठे घेवुन जाताय याबाबत अधिक चौकशी केल्यावर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांना जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आणून पाेलिस हिसका दाखविल्यावर त्यांनी त्यांची नावे ज्ञानेश्वर कोळी, मिथुन गोसावी, लखन सपकाळे, विष्णू कोळी अशी माहिती समाेर आली. या कारमध्ये असलेल्या 918 किलाे वजनाच्या 17 लोखंडी प्लेटा 918 किलो वजनाच्या या कळमसरे मारवड तालुका अमळनेर येथून चोरी केले असल्याची कबुली त्यांनी दिली. चोरांकडून मुद्देमाल तसेच त्यांच्या ताब्यातील वाहन मोटर इंडिका कार मारवड पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई एपीआय किशोर पवार, पीएसआय गणेश देशमुख, हवलदार गणेश पाटील, शिपाई समाधान पाटील व विनोद पाटील यांनी केली आहे.