भुसावळ (प्रतिनिधी) काल जोरदार झालेल्या पावसामुळे भुसावळ विभागात चार वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. तर दोन महिला जखमी देखील झाल्या आहे.
यासंदर्भात अधिक असे की, भुसावळ विभागात चार वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. यापैकी दोन घटना यावल तालुक्यातील अनुक्रमे डोंगरकठोरा, न्हावी येथील आहेत. तिसरी घटना मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळ शिवारात आणि चौथी घटना बोदवड तालुक्यातील चिंचखेड प्रगणेत झाली. याच घटनेत इतर दोन महिला देखील जखमी झाल्या आहेत.
















