धरणगाव (प्रतिनिधी) किर्लोस्कर कंपनीचे लेबल लावून जुने मशीनदेत तालुक्यातील एका ७२ वर्षीय वृद्ध शेतकरी महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, वृद्ध शेतकरी अन्नापूर्णा खंडेराव पाटील ह्या तालुक्यातील आव्हाणी येथे परिवारासह वास्तव्यास आहे. बाबुराव रावसाहेब खेळकर ( धंदा-संचालक पृथ्वीराज मोटर्स, भेंडा घाट ऑफिस शेजारी नेवासा रोड, शेवगाव ता. शेवगाव, जि. अहमदनगर) यांनी अन्नापूर्णा पाटील यांचा विश्वास संपादन करत दि.१४ मार्च २०२३ ते २९ सप्टेंबर २०२३ या काळात किर्लोस्कर कंपनीचे पॉवर टिलर मशीन देण्याच्या मोबदल्यात वेळोवेळी २ लाख ४० हजार रुपये आर.टी.जी.एस. ने प्राप्त करून केले.
परंतू ठरल्याप्रमाणे पॉवर टिलर न देता किर्लोस्कर कंपनीची बनावटी लेबल लाऊन जुने मशिनला कलर देवून ते नवे असल्याचे भासवून कंपनीची खोटा चेसीस नंबर प्लेट लावली. याबाबत अन्नापूर्णा पाटील विचारण्यास गेल्या असता शिवीगाळ करून पोलीस स्टेशनला तक्रार दिली, तर तुला बघून घेईन, अशी धमकी दिली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात भादवी कलम ४२०,४०६, ४०८, ४६५, ४६८, ४७१, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ गजानन महाजन हे करीत आहेत.