भुसावळ (प्रतिनिधी) मलकापूर येथील व्यापाऱ्याची ४ लाख ३५ हजारांत फसवणूक केल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गजानन वसंत सुशीर (रा. धरणगाव ता. मलकापूर जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात नितीन दिलीप नैनाणी (वय ३८, रा. माता महाकाली रोड वाधवाणी लॉन जवळ मलकापूर जि. बुलढाणा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ३० मार्च २०२२ रोजी १०.३० वाजेच्या सुमारास गजानन वसंत सुशीर (रा. धरणगाव ता. मलकापूर जि. बुलढाणा) हा नैनाणी यांच्या गाडीवर ड्रायव्हर असून सुशीरने नैनाणी यांच्या साई जिवन सुपर शॉपच्या तेलाचे मालाचे पैसे ४,३५,००० रु घेवुन नैनाणी यांचा विश्वासघात करुन फसवणुक केली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गजानन वसंत सुशीर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना उमाकांत पाटील उमाकांत पाटील करीत आहेत.