TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावच्या ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय व्यापार मंचावर झेप; निर्मल नेमाडे यांची IACCIच्या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रोत्साहन समितीवर निवड

vijay waghmare by vijay waghmare
August 30, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (प्रतिनिधी)  – केंद्र शासनाच्या विविध मंत्रालयांसोबत निकट समन्वयाने कार्यरत असलेल्या तसेच भारत–आंतरराष्ट्रीय व्यापार, गुंतवणूक आणि औद्योगिक सहकार्यासाठी कार्य करणाऱ्या इंडो-आफ्रिकन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (IACCI), मुंबई या प्रतिष्ठित संस्थेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रोत्साहन समितीवर (International Trade Promotion Committee) निर्मल सुधाकर नेमाडे यांची मानद समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्ती १ सप्टेंबर २०२६ पासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी राहणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील नांदेड तसेच अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथून आपल्या प्रवासाची सुरुवात करून स्वतःच्या कर्तृत्व, कौशल्य आणि आंतरराष्ट्रीय अनुभवाच्या जोरावर एका प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थेच्या उच्चस्तरीय समितीवर मानद सदस्य म्हणून स्थान मिळवणे, हा निर्मल नेमाडे यांचा प्रवास ग्रामीण भागातील तरुण आणि नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

निर्मल नेमाडे यांनी ‘इंटरनॅशनल बिझनेस अँड इंटरनॅशनल रिलेशन्स’ (International Business & International Relations) या विषयात उच्च शिक्षण घेतले आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी जेएनपीटी (JNPT) बंदरावर एका नामांकित इटालियन कंपनीत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. सध्या त्यांची संस्था केंद्र व राज्य शासनाच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी तांत्रिक आणि धोरणात्मक सल्लागार म्हणून कार्यरत आहे.

आंतरराष्ट्रीय व्यापार, लॉजिस्टिक्स आणि राजनैतिक संबंधांचा सखोल अभ्यास असण्यासोबतच आशिया, युरोप आणि आफ्रिका खंडातील अनेक देशांना भेटी देऊन तेथील बाजारपेठांचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला आहे. विविध देशांमधील व्यापार पद्धती, गुंतवणुकीच्या संधी आणि औद्योगिक क्षेत्राचा जवळून अभ्यास हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग आहे. भारत आणि आफ्रिकेतील द्विपक्षीय व्यापार संबंध अधिक दृढ करण्यासाठी असलेली त्यांची बांधिलकी आणि व्यापक आंतरराष्ट्रीय अनुभव लक्षात घेऊन चेंबरने त्यांची या समितीवर निवड केली आहे.

या समितीच्या माध्यमातून भारतीय आणि आफ्रिकन उद्योगांमधील नवीन व्यापारी संधींचा शोध घेणे, बी-टू-बी (B2B) बैठका आयोजित करणे, व्यापार शिष्टमंडळे (Trade Missions) घडवून आणणे तसेच परदेशी दूतावास, उच्चायुक्तालये आणि विविध शासकीय संस्थांशी समन्वय साधून थेट परकीय गुंतवणूक वाढविण्यासाठी ते सक्रिय योगदान देणार आहेत.

चेंबरच्या सरचिटणीसांनी नियुक्तीपत्रात नेमाडे यांच्या व्यावसायिक अनुभवाचे, जागतिक भ्रमंतीतून मिळालेल्या आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनाचे आणि भारत–आफ्रिका व्यापारी संबंध बळकट करण्यासाठी असलेल्या बांधिलकीचे कौतुक केले आहे. त्यांच्या अनुभवाचा संस्थेच्या उद्दिष्टांना गती देण्यासाठी मोठा फायदा होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.

जळगावच्या ग्रामीण भागातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून आंतरराष्ट्रीय उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील प्रतिष्ठित मंचावर मिळवलेले हे यश उल्लेखनीय मानले जात आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विविध उद्योग संघटना, व्यावसायिक मंडळे आणि सामाजिक क्षेत्रातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonFrom rural Jalgaon to the international trade arena: Nirmal Nemade selected for IACCI’s International Trade Promotion Committee.

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशिभविष्य 31 ऑगस्ट 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पहिले हिंदकेसरी किताब पटकावणारे श्रीपती खंचनाळे यांचं निधन

December 14, 2020

‘रजा अकादमीवर बंदी घाला नाहीतर…’ ; नितेश राणेंचं सूचक ट्विट !

November 13, 2021

अपघाताची जाणीव होताच बापाने मुलाला वाचवण्यासाठी बाजूला ढकलले ; मुलाचे प्राण वाचले, पित्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 29, 2023

पालकमंत्र्यांच्या मुलाच्या लग्नासाठी ‘हे’ मंत्री लावणार हजेरी !

November 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group