चाळीसगाव (प्रतिनिधी) आपल्या विविध विकासकामांच्या माध्यमातून जनतेच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असणारे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी गेल्या दोन वर्षात चाळीसगाव मतदारसंघात विकासकामांचा झंझावात सुरु केला आहे, या विकास कामांमध्ये आता चाळीसगाव शहरातील अजून 10 कोटींच्या विकास कामांची भर पडली आहे. चाळीसगाव शहरातील विविध प्रभागातील महत्वाचे रस्ते व खुली जागा विकसित करणे व सभामंडप, पथदिवे आदी कामांसाठी 10 कोटींचा भरघोस निधी मंजूर झाला आहे.
शहरातील पाणीपुरवठा योजना व भुयारी गटार योजना कामांमुळे खोदलेल्या रस्त्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता, याबाबत शहरवासियांना दिलासा देण्यासाठी गेल्या 2 वर्षात 50 कोटींहुन अधिक निधी रस्त्यांच्या कामांसाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी मंजूर करून आणला आहे.
चाळीसगाव शहरातील नव्याने मंजूर कामे व निधी खालीलप्रमाणे…
१) प्रभाग क्र. १७ मध्ये अंतर्गत रस्ते सुधारणा करणे – 1 कोटी
२) चाळीसगाव शहरातील वार्ड क्र. १६ व १७ मध्ये – 1 कोटी
३) प्रभाग क्र. १७ मध्ये पाटणा देवी रोड सर्व्हे नं.२३६ मध्ये रस्ते सुधारणा करणे – 50 लक्ष
४) प्रभाग क्र. १७ मध्ये सीतामाई नगर मधील ओपन स्पेस विकसित करणे. – 30 लक्ष
५) प्रभाग क्र. १७ मध्ये जगतगुरू संत तुकाराम महाराज मंदिर परिसर विकसित करणे – 30 लक्ष
६) प्रभाग क्र.१५ मध्ये पीर सलीम काद्री नगर परिसरातील रस्ते सुधारणा करणे – 20 लक्ष
७) प्रभाग क्र.१३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज घाटावरील व
दयानंद/सदानंद हॉटेल पुलालगत पथदिवे बसविणे – 30 लक्ष
८) प्रभाग क्र.१० मध्ये संत नामदेव नगर मधील रस्ते सुधारणा करणे – 50 लक्ष
९) प्रभाग क्र.९ मध्ये परिसरातील रस्ते सुधारणा करणे – 1 कोटी 50 लक्ष
१०) प्रभाग क्र.९ मध्ये चाळीसगाव शहरातील सिद्धिविनायक नगर हिरापूर
रोड, चाळीसगाव येथील सं.नं. ३२०/३/१/२/३ प्लॉट नंबर ५४
मधील ओपन स्पेस विकसीत करणे – 30 लक्ष
११) प्रभाग क्र.९ मध्ये पवार वाडी विठ्ठल मंदिर परिसरात सभागृह सभागृह
बांधकाम करणे – 20 लक्ष
१२) प्रभाग क्र.८ मध्ये ब्रिज कॉर्नर हॉटेलच्या पाठीमागील ग स बँकच्या लगतची ओपन स्पेस सुधारणा करणे – 15 लक्ष
१३) प्रभाग क्र.८ मध्ये ब्रिज कॉर्नर हॉटेलच्या पाठीमागील पी. व्ही. पाटील यांच्या घराजवळील ओपन स्पेस विकसित करणे – 15 लक्ष
१४) प्रभाग क्र.७ मध्ये बस स्टैंड मागील परिसर व गवळी वाडा
परिसरातील रस्ते सुधारणा करणे – 40 लक्ष
१५) प्रभाग क्र.४ मध्ये भडगाव रोड ते योगेश प्रोव्हिजन ते वेदमंजिरी ते सतीश शिरुडे ते एकनाथ शिरुडे यांच्या घरापर्यंत रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे – 35 लक्ष
१६) प्रभाग क्र.२ मध्ये प्रविण माऊली यांच्या घराजवळील ओपन स्पेस विकसित करणे. (तेजस कोणार्क शिक्षक कॉलनी परिसर) – 40 लक्ष
१७) प्रभाग क्र. २ मध्ये तेजस कॉलनी शिक्षक कॉलनी परिसरातील रस्ते सुधारणा करणे – 1 कोटी
१८) प्रभाग क्र. २ मध्ये श्रीराम नगर धुळे रोड परिसरातील ओपन स्पेस विकसित करणे – 40 लक्ष
१९) प्रभाग क्र. २ मध्ये श्रीकृष्ण हाउसिंग सोसा. येथील ओपण स्पेस विकसित करणे – 30 लक्ष
२०) प्रभाग क्र.२ मध्ये १८ मी.डी.पी. रस्त्यापासून शासकीय ITI ते शासकीय मुलींचे वस्तीगृह पर्यत रस्ता सुधारणा करणे – 75 लक्ष