जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषद जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत खोल्या नवीन इमारत बांधकामसाठी २१ कोटी ७४ लक्ष तर १६३ वर्ग खोल्या दुरुस्तीसाठी ४ कोटी ८९ लक्ष असा एकूण २६ कोटी ६३ लक्ष निधी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार मंजूर झाला आहे. जिल्ह्यातील जि.प. शाळा हे शैक्षणिक विकासाचे पायाभूत केंद्र व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करून नवीन वर्ग खोल्यांचे बांधकाम व शाळा दुरुस्ती मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण व्हावे, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जिल्यातील १०६ शाळांमधील २२५ शाळांच्या वर्ग खोल्या जीर्ण व पड़ाऊ झालेल्या होत्या तसेच एकाच वर्ग खोल्यांमध्ये २-२ तुकड्यांमधील विद्यार्थी एकत्र बसत होते. याबाबत आमदार व स्थानिक लोकप्रतिनिधी शाळा वर्ग खोल्या बांधकामाची मागणी करीत होते. त्यानुसार जिल्ह्यातील आवश्यक असणाऱ्या वर्ग खोल्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात याव्या असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील त्या त्या गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व्हेक्षण करून जिल्ह्यातील १०६ शाळांना २२५ नवीन वर्ग खोल्यांची आवश्यकता असल्याचे आणि १६३ शाळा दुरुस्ती बाबत जिल्हा परिषदेला अहवाल दिला होता.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आवश्यक असलेल्या २२५ वर्ग खोल्या पैकी १७९ वर्ग खोल्याच्या बांधकामासाठी प्रत्येक वर्ग खोलीसाठी शाळा दुरुस्तीची तालुका निहाय माहिती १२ लक्ष १५ हजार प्रमाणे २१ कोटी ७४ लक्ष ८५ हजार इतक्या निधीस आणि एका शाळा दुरुस्तीसाठी ३ लक्ष प्रमाणे १६३ शाळा खोल्या साठी एकूण ४ कोटी ८९ लक्ष निधील प्रशासकीय मान्यता दिली आहे. यात अमळनेर- ७ वर्ग खोल्या (८५ लक्ष ५ हजार), भडगाव १३ वर्ग खोल्या (१ कोटी ५७ लक्ष ९५ हजार), भुसावळ- ३ वर्ग खोल्या ( ३६ लक्ष ४५ हजार ), चाळीसगाव २६ वर्ग खोल्या (३ कोटी १५ लक्ष ९० हजार), एरंडोल- २ वर्ग खोल्या (२४ लक्ष ३० हजार), जामनेर २४ वर्ग खोल्या (२ कोटी ९१ लक्ष ६० हजार), जळगाव २० वर्ग खोल्या (२ कोटी ४३ लक्ष), पारोळा – १६ वर्ग खोल्या (१ कोटी ९४ लक्ष ४० हजार), रावेर – २ वर्ग खोल्या ( २४ लक्ष ३० हजार), यावल ११ वर्गखोल्या (१ कोटी ३३ लक्ष ६५ हजार), मुक्ताईनगर – ९ वर्ग खोल्या (१ कोटी ९ लक्ष ३५ हजार), पाचोरा ११ वर्गखोल्या (१ कोटी ३३ लक्ष ६५ हजार), धरणगाव १० वर्गखोल्या (१ कोटी २१ लक्ष ५० हजार), चोपडा – २१ वर्ग खोल्या (२ कोटी ५५ लक्ष १५ हजार) व बोदवड -४ वर्ग खोल्या (४८ लक्ष ६० हजार) मागणी नुसार उर्वरित ४६ वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी लवकरच निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
तालुका निहाय शाळा दुरुस्तीची माहिती !
अमळनेर ९ वर्ग खोल्या २७ लक्ष, भडगाव १० वर्ग खोल्या – ३० लक्ष, भुसावळ – ६ वर्ग खोल्या – १८ लक्ष, बोदवड १ वर्ग खोली ३ लक्ष, धरणगाव १० वर्ग खोल्या ३० लक्ष, पारोळा ९ वर्ग खोल्या – २७ लक्ष, जळगाव – ०८ वर्ग खोल्या २४ लक्ष, यावल – १३ वर्ग खोल्या – ३९ लक्ष, रावेर- २ वर्ग खोल्या – ६ लक्ष, चाळीसगाव २२ वर्ग खोल्या ६६ लक्ष, चोपडा १७ वर्ग खोल्या – ५१ लक्ष, मुकताईनगर – ८ वर्ग खोल्या – २४ लक्ष, एरंडोल- ७ वर्ग खोल्या – २१ लक्ष व पाचोरा १७ वर्ग खोल्या – ५१ लक्ष असे एकूण १६३ शाळा वर्ग खोल्या दुरुस्तीसाठी ४ कोटी ८९ लक्ष निधी मंजूर झाल्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.