धरणगाव प्रतिनिधी : जिल्हा- मंत्री पुत्र असूनही स्वतःला शेतकरी पुत्र म्हणवणारे प्रतापराव पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा व परिसरातून त्यांच्यावर राजकीय, सामाजिक व शक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी व हजोरो युवकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देवून आपल्या कार्यकतृत्वाने एक आदर्श निर्माण केला असून संयमी नेतृत्व व आश्वासक कर्तुत्व म्हणजे प्रतापराव पाटील आहेत अशी भावना मान्यवरांसह व युवकांनी यावेळी व्यक्त केली. पाळधी येथे वाढदिवसाचे औचित्य साधून “ विकी बाबा युवा मंच”यांच्यातर्फे आयोजित “मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा’ हा सुप्रसिद्ध कवी प्राध्यापक अनंत राऊत यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थिती देवून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
गावातील श्रीमंत असो वा गरीब प्रत्येक नागरिकाच्या मदतीला नेहमी धावून जाणारे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्यावर रविवारी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी सकाळपासूनच जिल्हाभरातून कार्यकर्ते , शिवप्रेमी तसेच ग्रामस्थांनी प्रतापराव पाटील यांच्या भेटी घेत शुभेच्छा व आशीर्वाद दिले. यावेळी केक न कापता फक्त शुभेच्छांचा स्वीकार करण्यात आला. सायंकाळी पाळधी येथे विकी बाबा युवा मंच यांच्यातर्फे आयोजित “मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा’ हा सुप्रसिद्ध कवी प्राध्यापक अनंत राऊत यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी काव्यमैफिलीमध्ये मित्राची महती सांगण्यात आली. प्रतापराव पाटील हे सर्वांशी मित्राप्रमाणे वागत असून त्यांच्या मैत्रीचा गोडवा या कवितेच्या माध्यमातून सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला नागरिकांनी व युवकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला जीपीएस मित्रपरिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले.
जनतेचे आशीर्वाद व युवकांचे प्रेमाने भारावलो – प्रतापराव पाटील
शुभेच्छांना उत्तर देतांना प्रतापराव पाटील यांनी सांगितले की, जीपीएस मित्र परिवारसह मतदार संघातील कार्यकर्ते मित्र माझ्यासाठी कायम पाठीशी उभे राहिले आहे. माझा साधारण वाढदिवस भव्यदिव्य साजरा केल्याबद्दल ऋण व्यक्त करतो. अशीच खंबीर साथ आणि प्रेम कायम राहू द्या हे मागणं नसून जनतेचे आशीर्वाद व युवकांचे प्रेमाने भारावलो असल्याचे सांगितले
कार्यक्रमाला सायंकाळी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, जिल्हाप्रमुख निलेश पाटील, जळगाव तालुका प्रमुख शिवराज पाटील, धरणगाव तालुका प्रमुख डी.ओ. पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ, मागासवर्गीय संघटना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंद नन्नवरे , जि.प. सदस्य पवन सोनवणे, संजय पाटील सर, यांसह जळगाव व धरणगाव तालुक्यातील महायुतीचे कार्यकर्ते व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रा. अनंत राऊत यांनी शिवाजी महाराज, इतिहास तसेच महिलांवर आपले विचार मांडले. शेवटी ‘मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा’ या कवितेने कार्यक्रमाचा समारोप झाला