अमळनेर(प्रतिनिधी) येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस. हायस्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न झाली. सहलीत विद्यार्थ्यांनी धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटन स्थळांचा मनमुराद आनंद लुटला. जी. एस. हायस्कूल ही तालुक्यातील मोठी शाळा असून दरवर्षी शाळेचे विद्यार्थी राज्यातील विविध ठिकाणी सहलीच्या माध्यमातून भेटी देत असतात.यावेळी शाळेने “मुंबई दर्शन” या सहलीचे आयोजन केले होते.
यात वणी गड, त्र्यंबकेश्वर, मुंबई मधील गेट वे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, मरीन ड्राइव, नेहरू तारांगण, नेहरू सायन्स सेंटर, बुट हाऊस, महालक्ष्मी मंदिर, गिरगाव व जुहू चौपाटी या ठिकाणांचा समावेश होता. शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा व शासनाच्या नियमांना अधीन राहून महामंडळाच्या एस.टी. बसने विद्यार्थ्यांनी प्रवास केला. या सहलीत एकूण १४८ विद्यार्थी तर १६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. एकूण ४ बसची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणांची भौगोलिक व वैज्ञानिक माहिती गोळा केली. संपूर्ण सहलीत विद्यार्थ्यांच्या मुक्कामाची तसेच भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती.
शाळेचे चेअरमन हरी भिका वाणी, मुख्याध्यापक व्हि.एम.पाटील यांच्या परवानगीने सहलीचे नियोजन करण्यात आले होते. सहल विभाग प्रमुख आर.जे. पाटील, आर.एन. साळुंखे यांनी सहलीचे नियोजन केले.उपशिक्षक जे.व्ही.बाविस्कर, एम.जी.पाटील, जी.एस.चौधरी, ए.ए.पाटील, एल.सी.बंजारा, वाय.आर.पाटील, जी.एस.चव्हाण, एच.एस.चौधरी, एन.जे.पाटील, सी.आर.पाटील, आर.एस.तेले, विपुल चव्हाण सहलीत सहभागी होते.













