नाशिक (वृत्तसंस्था) नाशकात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकमध्ये १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. नाशिक रोड परिसरातील आरिंगळे मळ्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. चाकुचा धाक दाखवून बलात्कार केल्याची पीडितेच्या आईची तक्रार आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी ७ संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
नाशिकरोड परिसरातील अरिंगळे मळ्यात १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार, नाशिकरोड पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या सात संशयितांमध्ये एका अल्पवयीन मुलासह एका महिलेचा देखील समावेश आहे. दीपक खरात (वय १९, रा. सिन्नर फाटा), रवी कुऱ्हाडे (वय १९, रा. पांडवलेणी जवळ), आकाश गायकवाड (वय २४, रा. रेल्वे ट्रॅक्शन, नाशिकरोड), सुनील कोळे (वय २४, रा. आम्रपाली झोपडपट्टी, कॅनॉलरोड), सोमनाथ खरात (वय १९, रा. गुलाबवाडी, मालधक्कारोड) आणि पूजा वाघ (वय २७) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
या सर्व संशयितांना नाशिक न्यायालयात रविवारी सकाळी हजर केले असता, त्यांना १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी दिली. पीडितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीवर संशयितांकडून दुसऱ्यांदा बलात्कार केला आहे.