TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘रामाच्या नावे तुकडे तुकडे गँग…’ ; संजय राऊतांचा ‘रोखठोक’मधून हल्लाबोल

The Clear News Desk by The Clear News Desk
April 17, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) रामाच्या नावाने तुकडे तुकडे गँग निर्माण होणार असेल तर अखंड हिंदू राष्ट्र कसे निर्माण होणार? रामाच्या नावाने निवडणूक जिंकाल, पण देश राहील काय?,” अशी विचारणा शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून केली आहे. मुंबई-ठाण्यात महापालिका निवडणुकांची ही तयारी व हनुमंताच्या नावावर दंगली घडल्या तर महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर राष्ट्रपती शासन, असा हा ‘गुणरत्नी’ खेळ सुरू आहे असंही राऊत म्हणाले आहेत.

“महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यांचे, तर देशात इतरत्र रामनवमीच्या दंगलींचे राजकारण सुरू झाले आहे. धर्मांधतेची आग लावून, शांततेला चूड लावून कुणाला निवडणुका जिंकायच्याच असतील तर ते देशाच्या दुसऱ्या फाळणीचे सुरुंग स्वतःच्याच हाताने पेरताना दिसत आहेत. ‘देशाचे तुकडे तुकडे झाले तरी चालतील, पण धार्मिक विद्वेष निर्माण करून निवडणुका जिंकायच्या’ असे धोरण भाजपासारख्या पक्षाने उघडपणे स्वीकारले आहे,” असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

“पश्चिम बंगालात हावडा-शिवपूर भागातही धार्मिक तणाव निर्माण झाला. विश्व हिंदू परिषदेने रामनवमीची यात्रा काढली. त्यात भडकाऊ भाषणे केली. त्यातून आग पेटली. रामनवमीत भडकाऊ भाषणांची प्रथापरंपरा कधी सुरू झाली? अशोक सिंघल विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख होते तोपर्यंत या प्रथापरंपरा नव्हत्या, मग हे सर्व आता कोण घडवत आहे? मुंबईत शिवसेनेने हिंदुत्वाच्या शोभायात्रा काढल्या तर त्यावर हे असे हल्ले वगैरे होणार नाहीत, पण भाजपा किंवा त्यांच्या ‘बी’ टीमने अशा यात्रा काढल्या तर हमखास गडबड होईल याची व्यवस्था करून ठेवलेली दिसते. रामनवमीच्या दिवशी झालेली हिंसा तेच सांगते,” असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रामनवमीच्या दिवशी ‘शाकाहार-मांसाहार’ या वादावरून दंगल पेटवण्यात आली. त्यात दहा विद्यार्थ्यांची डोकी फुटली. ते सर्व विद्यार्थी हिंदूच होते. रामजन्मदिनी ‘मांसाहार’ करायचा नाही इथून वाद सुरू झाला तो ‘रामनवमी’ उत्सवास विरोध केला म्हणून ‘राडा’ झाला या मुद्दय़ापर्यंत येऊन थांबला. देशभरात हिंदू-मुसलमानांत आग लावायची, दंगे भडकवायचे, त्याच आगीवर निवडणुकांच्या भाकऱ्या शेकवायच्या हा राजकीय खेळ देशाला जाळून टाकणार आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“हरिद्वारच्या एका हिंदू मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी येत्या पंधरा वर्षांत अखंड हिंदू राष्ट्र निर्माण होईल असे सांगितले. हातात काठी घेऊन अहिंसेच्या मार्गाने अखंड हिंदू राष्ट्र तयार करू ही कल्पना चांगलीच आहे, पण रामाच्या नावाने अशा हिंसेचे तांडव करून देश अस्थिरता व तणावाच्या खाईत ढकलला जात आहे. त्यातून नव्या फाळणीची बिजे रोवली जातील व अखंड हिंदुस्थान करताना धार्मिक विद्वेषातून निर्माण झालेले आपल्याच देशाचे तुकडे तुकडे वेचावे लागतील. एका फाळणीसाठी माथेफिरू गोडसे निर्माण झाला. गांधींना त्याने मारले. मरताना गांधी ‘हे राम’ म्हणाले! आज तोच राम अहंकार, धर्मांधतेच्या अग्नीत देश जळताना पाहत आहे! रामाच्या नावाने तुकडे तुकडे गँग निर्माण होणार असेल तर अखंड हिंदू राष्ट्र कसे निर्माण होणार? रामाच्या नावाने निवडणूक जिंकाल, पण देश राहील काय?,” अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

नागिनीनं बदला घेण्यासाठी एक नाही, दोन नाही, सात वेळा डसली ; सातही वेळेला तो वाचला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मिशन मोडवर कामकाज होणे आवश्यक : खा. रक्षाताई खडसे

October 5, 2021

वाकडी येथे वयोवृद्धेचा खून ; पोलिसांकडून कसून तपास !

May 12, 2024

२७ डिसेंबर पासून जळगावमध्ये बुध्दिबळ राज्य निवड चाचणी स्पर्धा

December 24, 2021

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी !

August 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group