पिंप्री खुर्द ता . धरणगाव (प्रतिनिधी ) :येथे काल बाप्पाचे सात दिवसाचे विसर्जन करण्यात आले असून गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात रात्री बाप्पाचे विसर्जन करण्यात आले .यावेळी संपूर्ण गावकऱ्यांसह परिसरातील असंख्य गणेश भक्तांनी मिरवणुकीच्या आनंद घेत तसेच शासनाचे नियमांचे कठोर तंतोतंत पालन करून व रहदारीस कोणताही अडथळा निर्माण होऊ नये याचे भान ठेवून बाप्पाचे विसर्जन केले . यावेळी हजारोंच्या संख्येने गावातील तसेच परिसरातील गणेश भक्त उपस्थित होते .गावात पाच बँड तसेच ढोल ताशांच्या तालावर गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात मिरवणुकीचा आनंद घेतला . खेळीमेळीच्या वातावरणात मिरवणूक पार पडली असून गावातील गणेश भक्तांनी तसेच परिसरातील गणेश भक्तांनी मिरवणुकीसाठी सहकार्य केले . तसेच धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला .














