जामनेर (प्रतिनिधी) शहरातील बाबाजी मार्केटमधील वरच्या मजल्यावर आयडीबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून तब्बल १२ लाख ७८ हजाराची रोकड लांबवली आहे.
या संदर्भात अधिक असे की, शहरातील बाबाजी मार्केटमधील वरच्या मजल्यावर आयडीबीआय बँकेचे एटीएम आहे. अज्ञात चोरट्यांनी २६ जानेवारी रोजी रात्री तीन वाजेच्या सुमारास एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची आधी दिशा बदलवली. त्यानंतर सायरन तोडून बाहेर फेकून दिला. यानंतर एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्यातील १२ लाख ७८ हजाराची रोकड कॅश वॉलटसह चोरून नेले. याप्रकरणी प्रसून परेशनाथ घोष (शाखाधिकारी, आयडीबीआय बँक, जामनेर) यांच्या फिर्यादीवरून भादवि कलम ३८०, ४५४ प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. किरण शिंदे हे करीत आहेत.
















