TheClearNews.Com
Saturday, August 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘दोन वर्षात मुक्ताईनगर मतदारसंघाचा कायापालट करू’ ; गुलाबराव पाटलांनी घेतला खडसेंचा समाचार

The Clear News Desk by The Clear News Desk
July 27, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्याच्या सत्तेत महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या शिवसेनेकडून पक्षसंघटन विस्तारासाठी शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. याच अभियानाच्या माध्यमातून शिवसेना नेते तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांचा चांगलाच समाचार घेतला. हे ३० वर्षे मुक्ताईनगरमध्ये मूलभूत सुविधा देऊ शकले नाहीत. एकीकडे मोठमोठ्या गप्पा मारायच्या आणि प्रत्यक्षात मात्र काहीच नाही. आपण दोन वर्षात या मतदारसंघाचा कायापालट करू’, असे ना. पाटील यांनी ठणकावून सांगितले.

राज्याच्या सत्तेत महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या शिवसेनेकडून पक्षसंघटन विस्तारासाठी शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. गेली ३० वर्षे खडसेंचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुक्ताईनगरात शिवसेनेने ‘पालकमंत्री आपल्या दारी’ या संकल्पनेवर नुकतीच आमसभा घेतली. या आमसभेत आजवर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात विकासाचा अनुशेष कसा राहिला? हा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेने खडसेंच्या कारकिर्दीवरच बोट ठेवले. शिवसेनेच्या या भूमिकेची जोरदार चर्चा आहे.

READ ALSO

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

राज्यात भाजप-सेनेत युती असतानाही एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात कधीही शिवसेना वाढू दिली नाही, हे शल्य शिवसैनिकांना नेहमीपासून आहे. याशिवाय युती तोडल्याची घोषणा देखील खडसेंनीच केली होती. तेव्हापासून शिवसैनिक खडसेंवर काहीसे नाराज आहेत. ही नाराजी मुक्ताईनगरात सातत्याने समोर येतच असते. म्हणूनच याठिकाणी खडसे सेनेच्या रडारवर असतात. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी झालेल्या आमसभेत खडसेंच्या नावाचा थेट उल्लेख न करता शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. खडसेंवर निशाणा साधताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, ‘हे ३० वर्षे मुक्ताईनगरमध्ये मूलभूत सुविधा देऊ शकले नाहीत. मुक्ताईनगर हे ना धड खेड आहे, ना शहर. याठिकाणी चांगले रस्ते नाहीत. पिण्यासाठी पाणी नाही, अशी अवस्था यांनी शहराची करून ठेवली आहे. एकीकडे मोठमोठ्या गप्पा मारायच्या आणि प्रत्यक्षात मात्र काहीच नाही. आपण दोन वर्षात या मतदारसंघाचा कायापालट करू’, असे गुलाबराव पाटील यांनी ठणकावून सांगितले.

एकनाथराव खडसेंना सलग तिसरा धक्का

गेल्या काही महिन्यांपासूनचा घटनाक्रम पाहिला तर मुक्ताईनगरात शिवसेनेने एकनाथ खडसे यांना सलग तिसरा धक्का दिला आहे. खडसेंना सर्वात पहिला धक्का बसला तो कोथळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत. याठिकाणी खडसेंचे वर्चस्व असताना शिवसेनेने ५ जागांवर मुसंडी मारली होती. त्यामुळे खडसेंच्या पॅनलला एकहाती सत्ता स्थापन करता आली नाही. ही निवडणूक होऊन काही महिन्यांचा कालावधी उलटत नाही तोच, शिवसेनेने मुक्ताईनगर नगरपंचायतीतील काही सदस्य फोडले. हे सदस्य भाजपचे असले तरी ते खडसे समर्थक होते. त्यामुळे हा देखील खडसेंना धक्का होता. त्यानंतर आता शिवसेनेने शिवसंपर्क अभियानाच्या कार्यक्रमात मुक्ताईनगरच्या विकासाच्या मुद्द्यावरून खडसेंना लक्ष्य केले. मित्रपक्षात असलेल्या खडसेंना हा धक्काच मानला जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

August 8, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
गुन्हे

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

August 7, 2026
जिल्हा प्रशासन

जनसामान्य सक्षमीकरण : भुसावळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘जनसमाधान बैठक’ संपन्न

August 7, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष दाखवून तीन वर्षांपासून तरुणीवर अत्याचार

August 7, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
Next Post

'अखंड साथ. अतूट नाते...' ; संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पुन्हा एकदा ‘फर्जीवाडा…रेस्टॉरंट आणि बारचे फोटो ट्वीट करत क्रांती रेडकरचा नवाब मलिकांवर टीका !

November 21, 2021

तू मुंबई सारख्या ठिकाणी राहण्याच्या लायक नाही म्हणत विवाहितेचा छळ

August 24, 2022

भुसावळ आयुध निर्माणी कामगारांचे विरोध प्रदर्शन !

September 23, 2020

शेगावला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला ; कार-ट्रकच्या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू

March 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group