मुंबई (वृत्तसंस्था) तुम्हाला लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे आहे का ? तर, तुमच्यासाठी दिलासादायक वृत्त आहे. आता लर्निंग लायसन्ससाठी लोक घरबसल्या केवळ आधार कार्डच्या डिटेल्सद्वारे अप्लाय करू शकतात. यासाठी टेस्टदेखील ऑनलाईनच घेतली जाईल. त्यानंतर आधारद्वारे त्या व्यक्तीची ओळख केली जाईल आणि घरबसल्याच लर्निंग लायसन्स मिळेल.
मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ५० रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस अर्थात RTO साठी दोन महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. पहिल्या आदेशानुसार, आता लर्निंग लायसन्ससाठी लोक घरबसल्या केवळ आधार कार्डच्या डिटेल्सद्वारे अप्लाय करू शकतात. यासाठी टेस्टदेखील ऑनलाईनच घेतली जाईल. आधारद्वारे त्या व्यक्तीची ओळख केली जाईल आणि घरबसल्याच लर्निंग लायसन्स मिळेल. दुसऱ्या आदेशानुसार, डिलर्सला आता नॉन-ट्रान्सपोर्ट व्हिकल रजिस्ट्रेशनसाठी RTO मध्ये येण्याची गरज नाही. हेदेखील आधार ऑथेंटिकेशनद्वारे आता शक्य होणार आहे.
महाराष्ट्रातील ट्रान्सपोर्ट कमिश्नर अविनाश धनखडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या दोन दिवसांत स्वत: या योजनांची सुरुवात करू शकतात. या सुविधा सुरू झाल्यास, आरटीओमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या कमी होईल. यामुळे भ्रष्टाचार आणि एजेंट्सद्वारे लायसन्स देण्याचं कामही बंद होईल. लोकांचा वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी वाचतील. लायसन्स रिन्यू करणं, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट यासारख्या एकूण 18 गोष्टींसाठी आता आधार ऑथेंटिकेशनद्वारे काम होईल. यावर्षी मार्च महिन्यापासूनच अनेक सुविधांसाठी याचा वापर केला जात आहे.
कशी होईल लर्निंग लायसन्स टेस्ट
या टेस्टमध्ये रोड सेफ्टीबाबत काही व्हिडीओ दाखवले जातील. त्यानंतर टेस्ट द्वावी लागेल. या टेस्टमध्ये ६० टक्के गुण मिळवणं अनिवार्य असून त्यानंतरच लायसन्स दिलं जाईल.
रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट रिन्यूअल
नव्या गाडीची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सोपी व्हावी असा या नव्या गाइडलाइन्सचा उद्देश आहे. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट रिन्यूअल आता ६० दिवस अॅडव्हान्समध्ये केलं जाऊ शकतं. त्याशिवाय तात्पुरत्या रजिस्ट्रेशनचा कालावधीही आता १ महिन्यावरुन ६ महिने करण्यात आला आहे. यासह सरकारने लर्निंग लायसन्स साठीच्या प्रक्रियेतही काही बदल केले आहेत. त्यानुसार ड्रायव्हिंग टेस्टसाठी RTO जाण्याची गरज लागणार नाही. हे काम व्हिडीओद्वारे घरबसल्या ऑनलाईन केलं जाऊ शकतं. कोरोना काळात हे पाऊल उचलण्यात आलं आहे.