वॉशिंगटन – अंतराळातील एका महाकाय उल्केचा पृथ्वीला धोका असून येत्या ४८ वर्षात हि उल्का पृथीवर कोसळण्याचा अंदाज नासाच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
प्रलयाची देवता म्हणून ओळखल्या जात असलेल्या या उल्केने आता वेग धरला असून हि उल्का पृथ्वीच्या कक्षेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. हवाई विश्वविद्यालायच्या खगोलशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीपप्रमाणे अपोफिस नावाची हि उल्का जर पृथ्वीवर धडकली तर ८८ कोटी टन टीअँटी स्फोटकांचा क्षमतेचा स्फोट होऊ शकतो. वैज्ञानिकानी दिलेल्या माहितीप्रमने 12 एप्रिल 2068 रोजी हि उल्का पृथ्वीला धडकू शकते. अपोफिस ऐस्टरॉइचा शोध एरिजोना येथील वेधशाळेने 19 जून, 2004 रोजी लावला होता. हि उल्का निकेल और लोह यापासून बनली असून तिचा आकार वाढत चालला आहे एखाद्या भुईमूग शेंगेप्रमाणे आता या उल्केचा आकार झाला आहे.