धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावातील एका भागात आठ आणि पाच वर्ष अशा दोन बालिकांसोबत अश्लील चाळे करणाऱ्या ६२ वर्षाच्या वृद्ध आरोपीला लवकरात लवकर कडक शासन व्हावे, यासाठी आज धरणगावात महिलांच्या ज्वालामुखीचा मूक लाव्हा उसळला. आज निघालेल्या भव्य मूक मोर्च्यात शहरातील प्रत्येक नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते.
बालिका विनयभंग प्रकरणाने शहरातील महिला वर्गामध्ये प्रचंड प्रमाणात चीड निर्माण झाली आहे. त्या नराधमाची केस प्रशासनाने लवकरात लवकर फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालून त्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी एकमुखी मागणी मोर्च्यात सहभागी महिलांनी केली. या प्रसंगी शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ, माजी नगराध्यक्षा पुष्पाताई महाजन, नाजनीन शेख, लिटल ब्लॉसम स्कूलच्या संचालिका ज्योती जाधव, प्रा.कविता महाजन यांनी आपले निषेधपर मनोगत व्यक्तकरित येणाऱ्या संकटांना व घटनांना महिला मुलींनी कशा प्रकारे तोंड द्यावे. तसेच आरोपीच्या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला. दरम्यान, नाजनीन शेख यांच्या मनोगताने उपस्थित महिलांसह सर्वांनाच विचार करायला भाग पाडले.
लिटिल ब्लॉसम स्कूल आणि धरणगाव महाविद्यालयकडून पीडित मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी
लिटिल ब्लॉसम स्कूल आणि धरणगाव महाविद्यालयकडून पीडित मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यात आली आहे. तर धरणगाव शिवसेनेकडून 21 हजारांची मदत तात्काळ देण्यात येत आहे असे प्रतिपादन गुलाबराव वाघ शिवसेना सहसंपर्कप्रमुख जळगाव लोकसभा यांनी केले. त्याच प्रमाणे शहरातील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे सचिव डॉ. मिलिंद डहाळे यांनी पीडित मुलींना पुढील महाविद्यालयीन शिक्षण मोफत करून लागेल ती मदत करू असे आश्वासन दिले. पीडित कुटुंबास सावरण्याच्या एक छोटासा प्रयत्न करण्यात आला. तसेच इतरही सामाजिक संस्था व व्यक्तिगत स्वरूपात मदत जाहीर करून कुटुंबाला आधार देण्याच्या प्रयत्न केला.
पो.नि.शंकर शेळके यांना महिला भगिनींकडून निवेदन सादर
पीडित कुटुंबातील मुलींना त्वरित न्याय देऊन सदरील खटला हा सरकारी वकिल उज्वल निकम यांच्याकडे देण्यात यावा. तसेच त्या नराधमास लवकरात लवकर फाशीची शिक्षा दिली जावी. अशा स्वरूपातील निवेदन यावेळी धरणगाव पोलीस ठाण्याचे पो.नि.शंकर शेळके यांना देण्यात आले. याप्रसंगी धरणगाव नायब तहसीलदार सुद्धा उपस्थित होते.
या प्रसंगाचे गांभीर्य ओळखून पो.नि.शेळके यांनी माता भगिनींना आश्वाशीत केले की, पीडित कुटूंबाला योग्य तो न्याय न्यायालय मिळवून दिला जाईल. एवढेच नव्हे तर पिडीत मुलींना मनोधैर्य योजनेअंतर्गत सुद्धा मदत मिळवून देण्यात येईल व कुटूंबाला योग्य ते सहकार्य व सुरक्षा प्रदान करण्यात येईल.
भाग एक
https://fb.watch/blvuMXl-Ya/
भाग दोन
https://fb.watch/blvyJ5rb-Z/