चाळीसगाव (प्रतिनिधी) मतदान मागायला कोणी आलं नाही तरी आपण भाजपला मतदान केलं, त्यांना अनेक वेळा संधी दिली. आता यावेळी बदल करून तरुणाला आपल्या मतदार संघाची सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांनी चाळीसगावकरांना केले.
करणदादा पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवार, दि. ४ रोजी चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणे खु, हिंगोणे सीम, वाघळी, बोरखेडा फाटा, पातोंडा, ओझर, टाकळी प्र. चा., खरजई, तरवाडे, बिरखेडे, न्हावे, टेकवाडे खू., कसबे आणि रथ बहाळ, खेडगाव, पोहोरे, करमुळ, दहीवद, मेहूणबारे, तिरपोळे, वरखेडे बु., कृष्णापुरी, लोंढे, दरेगाव, पिलखोड, उपखेड, मांदुर्णे, सायगाव यांसह विविध गावात रॅली काढण्यात आल्या तर काही गावात कॉर्नर सभा घेण्यात आल्या, याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आ. राजीव देशमुख, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, जिल्हा परिषद सदस्य भूषण पाटील, जिल्हा परिषद गट नेते शशी साळुंखे, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर,महिला आघाडीच्या सुनीताताई काटे, सविता साळवे, पंचायत समिती सदस्य रवी चौधरी, पद्माकर पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, प्रदीप निकम, भगवान राजपूत, शिवसेनेचे तालुका प्रमुख गणेश चव्हाण, शहरप्रमुख नानाभाऊ कुमावत, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, युवासेना विस्तारक सुरेश पाटील, शिवसेनेचे राज्य प्रवक्ते विठ्ठलराव ढमाले-पाटील, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष रवी जाधव, नितीन परदेशी, जि. प. सदस्य भूषण पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहित भोसले, आकाश पोळ, बंजारा समाजाचे युवानेते मोरसिंग राठोड, दिलीप घोरपडे यांसह घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी व कार्यक्रर्ते उपस्थित होते.
मशालच्या माध्यमातून जिल्ह्यात क्रांती घडवायची आहे !
मतदार संघात विकासाची गंगा पुढे न्यायची असून ‘मशाल’च्या माध्यमातून क्रांती घडवायची आहे, त्यासाठी येणाऱ्या १३ तारखेला मशालला मतदान करून क्रांती करावी, असे आवाहन खा. उन्मेषदादा पाटील यांनी केले.