अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरातील नामांकित संस्थापैकी एक असलेल्या खा.शि.मंडळ संचलित गं.स.विद्यालयात वर्धापनदिनानिमित्ताने या वर्षी ग्रीन स्कूल ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. शाळेच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी शाळेचे चेअरमन योगेश मुंदडे व मुख्याध्यापक डिगंबर महाले यांच्या संयुक्तिक प्रयत्नातून ही संकल्पना साकारली जाणार आहे.
१८ जुलै रविवार रोजी शाळेचा वर्धापन दिनानिमित्ताने हा उपक्रम राबवला जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष जितेंद्र जैन तर उदघाटन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. संस्थेच्या सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ व संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत कोविड नियमांचे पालन करून हा कार्यक्रम पार पडणार आहे.