नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जंगल सफारीचा आनंद लुटणाऱ्या एका प्रवाशाला टॉयलेटला जाणं चांगलंच महागात पडलं आहे. त्याच्या गुप्तांगाला विषारी सापाने दंश केल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. या व्यक्तीला आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टला वाचवण्यासाठी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करावी लागली. ४७ वर्षीय पर्यटक जंगल सफारीच्या वेळी टॉयलेटचा वापर करत होता. त्यावेळी ही घटना घडली.
टॉयलेटचा वापर करत असताना कोब्रा सापाने या व्यक्तीला चावा केला. यानंतर तब्बल तीन तास ही व्यक्ती त्याच अवस्थेत पडून राहिली. नंतर त्याला ३५० किलोमीटर दूर एका ट्रॉमा सेंटरमध्ये घेऊन जाण्यात आलं. मात्र तोपर्यत या व्यक्तीच्या गुप्तांगात तीव्र वेदना सुरू झाल्या होत्या आणि ती छातीपर्यंत पोहोचल्या होत्या. अधिकाऱ्यांनी सांगितलं, की ही पहिलीच घटना आहे, ज्यात कोब्राने एखाद्या व्यक्तीच्या गुप्तांगावर हल्ला केला आहे.
जेव्हा या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तोपर्यंत त्याचा प्रायव्हेट पार्ट वाईट पद्धतीनं सूजला होता. पीडित व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना त्याची सर्जरी करावी लागली. ट्रॉमा सेंटरमधील एका डॉक्टरनं सांगितलं, की याआधी असं कोणतंही प्रकरण समोर आलेलं नाही, ज्यात एखाद्या कोब्राने व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला चावलं. मात्र, सुदैवाने या डच नागरिकाचा जीव वाचला. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टची Reconstructive Surgery करावी लागली.