मुंबई (वृत्तसंस्था) मागील २४ तासांत कोरोनाचे देशात ९० हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्याचे पडसाद आज गुरुवारी कमॉडिटी बाजारात उमटले. आज बाजार सुरु होताच सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. सोने २५० रुपयांनी तर चांदी ९०० रुपयांनी स्वस्त झाले. गुरुवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७७७५ रुपये इतका खाली आला आहे. त्यात २४६ रुपयांची घसरण झाली.
एक किलो चांदीचा भाव ६१३६० रुपये असून त्यात ८७८ रुपयांची घसरण झाली आहे. तत्पूर्वी कालच्या सत्रात बुधवारी सोने ६० रुपयांनी महागले होते. तर मंगळवारी सोनं २३४ रुपयांनी आणि चांदी ५०६ रुपयांनी महागली होती. Goodreturns या वेबसाईटनुसार आज गुरुवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७०७० रुपये इतका खाली आला आहे. २४ कॅरेटचा भाव ४९०७० रुपये इतका आहे.आज दिल्लीत सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७२९० रुपये इतका आहे. दिल्लीत २४ कॅरेटचा सोन्याचा भाव ५१५७० रुपये आहे.
आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४५१७० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९२३० रुपये इतका आहे. त्यात २५० रुपयांची घसरण झाली. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७२४० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९९४० रुपये इतका आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात आज स्पॉट गोल्डचा भाव वाढला. त्यात ०.८ टक्के वाढ झाली आणि १८१५ डॉलर प्रती औंस इतका झाला. यूएस गोल्ड फ्युचर्स १८०४.५० डॉलर प्रती औंस आहे. चांदीचा दर प्रती औंस २२.९२ डॉलर इतका आहे.