जळगाव (प्रतिनिधी) शेतात बळीराजा आणि बैल ऊन असो वा पाऊस, तरी देखील राब राब राबतात. जितके कष्ट बळीराजा घेतो तितकेच कष्ट, बैल देखील शेतात घेतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील केले.
आज नेहरू चौक मित्रमंडळ येथे अजय गांधी युवा सेना उपशहर प्रमुख, रितेश गांधी तसेच संजू गांधी यांच्यावतीने शेतकऱ्यांना बैल पोळ्यानिमित्त साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, चोपडाचे आमदार लताताई सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील उपस्थित होते.