अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव ते दोंडाईचा एसटी बसमध्ये प्रवासादरम्यान अमळनेर शहरातील चोपडा नाका (पैलाड चौकी) येथे महिलेच्या पर्समधून 3 लाख 60 हजार रुपयांचे सोन्याचा दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 8 मार्च 2024 रोजी प्रतिभा जिजाबराव पाटील (वय 48, रा. गारखेडा ता. धरणगाव) या जळगाव ते दोंडाईचा एसटी बसमध्ये असताना अमळनेर शहरातील चोपडा नाका (पैलाड चौकी) दरम्यान त्यांच्या पर्समधील 1 लाख 60 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, 2 लाख रुपये किमतीची गळ्यातील सोन्याची मंगळपोत, असा एकूण 3 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी प्रतिभा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर हे करीत आहेत.