मुंबई (वृत्तसंस्था) आज सोमवारी सोन्याचा भाव ३८० रुपयांनी तर चांदीमध्ये ८५० रुपयांची वाढ झाली. मागील एक महिन्यातील सोन्याचा हा सर्वाधिक भाव आहे. सध्या मल्टी कमाॅडिटी एक्सचेंजवर १० ग्रॅम सोन्याचा भाव ५३३५७ रुपये इतका वाढला आहे. त्यात ३६५ रुपयांची वाढ झाली. एक किलो चांदीचा भाव ६९८६० रुपये इतका वाढला असून त्यात ८२८ रुपयांची वाढ झाली आहे.
Goodreturns या वेबसाईटनुसार आज सोमवारी १८ एप्रिल २०२२ रोजी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९५५० रुपये इतका आहे. २४ कॅरेट सोन्याचा मुंबईतील भाव ५४०६० रुपये इतका आहे. आज दिल्लीत सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९५५० रुपये इतका आहे. दिल्लीत २४ कॅरेटचा सोन्याचा भाव ५४०६० रुपये इतका आहे.
चेन्नई कोलकात्यात सोन्याचा भाव काय ?
आज चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५०१४० रुपये इतका आजचा २४ कॅरेट सोन्याचा भाव ५४७०० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९५५० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५४०६० रुपये इतका आहे.
जागतिक कमाॅडिटी बाजारात भाव वाढला
जागतिक कमाॅडिटी बाजारात आज स्पॉट गोल्डचा भाव १९८४.५८ डॉलर प्रती औंस इतका वाढला आहे. त्यात ०.५ टक्के वाढ झाली. यूएस गोल्ड फ्युचर्सचा भाव १९७८.२१ डाॅलर प्रती औंस इतका वाढला आहे. चांदीचा भाव २५.८७ डॉलर प्रती औंस इतका वाढला आहे. त्यात ०.७ टक्के वाढ झाली आहे.