मुंबई (वृत्तसंस्था) आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४७,७४० आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६१,२०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
काय आहे आजचा भाव?
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,७४० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,०९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,७७० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१४० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,७७० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१४० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,७७० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,१४० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६१२ रुपये आहे.